अकोला : ‘नायलॉन’ मांजा वापर व विक्रीस प्रतिबंध ; जिल्हाधिकारी अरोरा

दुखापतग्रस्त पक्षांना स्वयंसेवी संस्थेकडे उपचारार्थ सोपविण्याचे आवाहन
akola collector
akola collectorsakal media

अकोला : प्लास्टिक पासून बनविलेला नायलॉन मांजा हा पशु, पक्षी व मानवास दुखापती होण्यास कारणीभूत ठरत असल्यामुळे जिल्ह्यात नायलॉन मांजा वापर व विक्रीस प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सोमवारी निर्गमित केले आहेत. दरम्यान अशा पतंगबाजीमुळे (Kite flying)जखमी झालेले पक्षी(injured birds and animals) वा जनावरे आढळल्यास त्यांना उपचारासाठी ‘सेव्ह बर्डस’ या सेवाभावी संस्थांकडे सोपवावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी निमा अरोरा(collector nima arora) यांनी केले आहे.

akola collector
अकोला वीज ग्राहकांना महावितरणचा दणका

यासंदर्भात निर्गमित आदेशात म्हटले आहे की, ‘नायलॉन मांजा’ या नावाने परिचित असलेल्‍या पक्‍क्‍या धाग्‍यामुळे पक्षी व मानव जिवितास इजा होते. तसेच पतंगासह ते सर्व तुटलेले नायलॉन मांजाच्‍या धाग्‍यांचे तुकडे जमिनीवर पडतात व सदर तुकडे लवकर विघटन होण्‍याजोगे नसल्‍याने गटारे व नदी-नाल्‍यासारख्‍या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात. त्यासोबतच गाय अथवा तत्‍सम प्राण्‍यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समविष्‍ट असलेले खाद्य सेवन केल्‍याने त्‍यांना प्राणघातक ठरतात. अशा अपघटन न होऊ शकणाऱ्या प्लास्टिकच्‍या धाग्‍यांच्या अति वापरामुळे विजेच्‍या तारांवरील घर्षणामुळे होणाऱ्या ठिणग्‍यांनी लागणाऱ्या आगीमुळे वीज प्रवाह खंडीत होवून वीज केंद्रे बंद पडतात व त्‍यामुळे अपघात होणे, वन्‍यजिवांना धोका पोहोचणे तसेच जीवितहानी होण्‍याचा संभव असतो. तसेच या संदर्भात मुंबई उच्‍च न्‍यायालय खंडपीठ नागपूर यांनी नायलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्‍यासाठी प्रत्‍येक शहरात विशेष पथक स्‍थापन करण्‍याचा आदेश दिला आहे व त्‍यानुसार बंदीचे उल्‍लंघन करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करून नायलॉन मांजा बंदीविषयी व्‍यापक जनजागृती करणेबाबत निर्देश दिले आहेत.

akola collector
अकोला जिल्हा परीषदेच्या सभेची मागणी फेटाळली; दोन सभापतींसह इतर सदस्यांना चपराक

‘सेव्ह बर्डस’चे सहकार्य घ्या

नायलॉन मांजामुळे पतंग उडवितांना आकाशात विहरणारे पक्षी तसेच तुटलेल्या पतंगासोबत लटकलेल्या मांजामध्ये अडकूनही अनेक पक्षी जायबंदी होत असतात. अशा जखमी पक्षांना ‘सेव्ह बर्डस अकोला’ या संस्थेचे कार्यकर्ते उपचार करतात. तरी नागरिकांनी आपल्या जवळपास जखमी दुखापतग्रस्त पक्षांना उपचारासाठी या संस्थेच्या स्वयंसेवकांकडे सुपूर्द करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी अरोरा यांनी केले आहे.

काय आहे आदेशात

  1. प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्‍तूपासून बनविलेल्‍या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्‍या पक्‍क्‍या धाग्‍याच्‍या वापरावर बंदी घालण्‍यात यावी.

  2. घाऊक व्‍यापारी, किरकोळ व्‍यापारी तसेच साठवणूकदार यांनी तत्‍परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवावी ज्‍यायोगे संपूर्ण वर्षभरात त्याची साठवणूक, हाताळणी व विक्री होणार नाही.

  3. नायलॉन मांजामुळे गुरांना उद्भवणाऱ्या धोका, माती व पाण्‍याच्‍या गुणवत्‍तेची पातळी घसरणे तसेच एकंदरीत परिस्थितीत प्राणीजातीला उद्भवणाऱ्या इजांना प्रतिबंध करण्‍यात यावा.

  4. पतंग उडविताना केलेल्‍या मांजाच्‍या वापरामुळे विजेच्‍या तारांवर घर्षण होवून आग लागणे, उपकेंद्रे बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जिवीतहानी होणे याबाबतची जनजागृती करण्‍यात यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com