

बार्शीटाकळी : नागरिकांच्या सोयीकरिता भमूिअभिलेखामधील प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन आणि तेही मोफत पाहता येणार आहे. हा उपक्रम भूमिअभिलेख विभागाकडून सुरू करण्यात आला आहे. नागरिकांना यापूर्वी ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड पहावयाचे असेल तर, त्यांना भूमिअभिलेख विभागाच्या ‘महाभूमी’ या संकेत स्थळावर जाऊन शासनाने ठरवून दिलेले शुल्क ऑनलाइन भरावे लागत होते. त्यानंतरच प्रॉपर्टी कार्ड पाहून ते डाउनलोड करता येत होते.
भूमिअभिलेख विभागाने नागरिकांच्या सोयीकरिता ‘महाभूमी’मध्ये बदल केले असून, ज्या नागरिकांना केवळ प्रॉपर्टी कार्ड पाहावयाचे आहे त्यांना ते मोफत ऑनलाइन पाहण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, डाउनलोड करून घेण्याकरिता नागरिकांना पैसे द्यावे लागणार आहेत. ऑनलाइन प्रॉपर्टी कार्डच्या सुविधेमुळे मालमत्तेची खरेदी आणि विक्री व्यवहार, बँकेचे कर्ज यामध्ये होणाऱ्या गैरकारभारांना आता आळा बसणार असल्याचे संबंधिताकडून सांगण्यात येत आहे.
प्रॉपर्टी कार्ड विविध कामांसाठी हवे असल्यास डिजिटल स्वाक्षरी असलेले कार्ड महाराष्ट्र शासनाने राज्यातील विविध भागांसाठी ठरवून दिलेली रक्कम ऑनलाइन भरल्यानंतरच ते डाउनलोड होणार आणि तेच कार्ड विविध कामांकरिता ग्राह्य धरण्यात येणार आहे.ऑनलाइन प्रॉपर्टी कार्डची ट्रायल गत दीड महिन्यांपासून सुरू होती, आता मात्र ते प्रत्यक्षात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
कसे पहावे ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड ?
ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड पाहण्यासाठी नागरिकांनी ‘महाभूमी’च्या संकेतस्थळावर जाऊन मालमत्ता पत्रकावर क्लिक करावे, त्यानंतर संबंधित जिल्हा, तालुका आणि गाव पाहावे, त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड (मालमत्ता मिळकत पत्रिका) क्रमांक टाकावा. त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन पाहता येणार असल्याची माहिती भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब काळे यांनी दिली.
अकोला जिल्ह्यातील ८०७ गावांची ड्रोन फ्लाईंग पूर्ण झाले असून, मूर्तिजापूर तालुक्यातील ६२ गावे, तेल्हारा तालुक्यातील ६६ गावांच्या मिळकत पत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत. बाकीच्या तालुक्यांना एप्रिल २०२२ पर्यंत मिळकत पत्रिका उपलब्ध होणार आहेत.
-विलास शिरोळकर, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख, अकोला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.