तिने उचलला देशसेवेचा विडा; पहिली महिला सैनिक म्हणून गौरव

ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेताना कुठल्या क्षेत्राची निवड करावी आणि कसले शिक्षण घ्यावे याबाबत नेहमीच, संभ्रम असतो.
rakhi salave
rakhi salavesakal

अमोल बोबडे

देऊळगाव मही (जि. बुलडाणा) - ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेताना कुठल्या क्षेत्राची निवड करावी आणि कसले शिक्षण घ्यावे याबाबत नेहमीच, संभ्रम असतो. त्यातच शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात दहावी ते बारावी शिक्षण झाल्यानंतर कधी एकदा मुलीचा विवाह करतोय आणि कधी नाही अशी चिंता पालकांना असते. परंतु, मुळातच वडिलांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची जिद्द आणि मेहनतीची तयार असल्यामुळे पैशासाठी नव्हे तर देशरक्षणासाठी प्राण्याची आहुती देण्याचा आत्मविश्‍वास घेऊन जिल्ह्यातील पहिली महिला सैनिक होण्याचा मान मिळविला आहे तो पिंप्री आंधळे येथील राखी साळवे या युवतीने.

देऊळगावराजा तालुक्यातील हजार ते बाराशे लोकवस्ती असलेले पिंप्री आंधळे हे गाव. या गावातील राखी माणिकराव सावळे हीचे प्राथमिक शिक्षण गावातील जि.प. शाळेत झाले. त्यानंतर ती माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी शिवाजी हायस्कूल चिखली येथे आली. पदवीपर्यतचे शिक्षण तेथे पूर्ण केले. त्यातही अकरावी व बारावीमध्ये एनसीसी घेतले होते.

rakhi salave
प्राण गेले तरी, आता माघार नाही; तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन

पदवी झाल्यानंतर इतर युवतीप्रमाणे स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु केली. परंतु, ग्रामीण भाग असल्यामुळे मार्गदर्शनाचा अभाव होता. यात, रोज सकाळी मुले स्वत:हून सैन्य आणि पोलिस भरती होण्यासाठी मैदानी चाचणीचा सराव करत होते. दरम्यान, राखी व तिच्या मैत्रिणीही यामध्ये सहभागी होत मैदानी सराव सुरु केला. त्यानंतर त्यांनी सैन्य भरतीमध्ये जाण्याचे ठरविले. यासाठी औरंगबाद येथे लेखी आणि नाशिक येथे मैदानी चाचणी 2018 मध्ये झाली. परंतु, त्याच काळात कोरोनाचा शिरकाव झाल्याने केलेली मेहनत वाया जाते की काय अशी भिती सातत्याने होती.

परंतु, आत्मविश्‍वास आणि परिवारातील सदस्यांची साथ म्हणून मार्च 2021 मध्ये नागालॅड येथे 6 महिने प्रशिक्षणासाठी निवड झाल्याचे पत्र हातात आले अन् आनंद गगनात मावेनासा झाला. दरम्यान, नुकतेच त्याचे सहा महिने प्रशिक्षण पूर्ण झाले असून, उर्वरित तीन महिने प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना युनिट बहाल करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करुन गावात सैनिकाच्या वेशभूषेत आलेल्या राखीचे गावकर्‍यांनी जंगी स्वागत केले.

गावकर्‍यांनी फटाके, होर्डिंगसह ढोल ताशाच्या गजरात तिचे स्वागत केले. यावेळी माजी सैनिक पुनमचंद मरमट, माणिकराव साळवे,राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष रवींद्र इंगळे, राष्ट्रवादी जिल्हा सचिव सुभाष शिंगणे, स्वाभिमानी नेतेकुंडलिक शिंगणे,सरोज महिला पतसंस्थेचे व्यवस्थापक बबनराव जाधव,अनिल शिंगणे, शिवाजी शिंगणे, डॉ कैलास उगले,शेख रफिक,वसीम परवेज,शेख अन्सार टेलर, शेख आसद, अफरोज पठाण, गजानन शिंगणे,शांतीलाल मामाजी,सुरेश कुटे यावेळी गावातील तरुण,तरुणी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

rakhi salave
युथ काँग्रेसच्या निवडणुकीची अकोला जिल्ह्यात धामधूम

ग्रामीण भागातील मुलींनी खचून न जाता खूप मेहनत करावे म्हणजे यश हमखास मिळते. देशसेवेचे भाग्य कुणाच्या नशिबात आहे हे मेहनत आणि परिश्रमावर ठरते. त्यामुळे देशसेवेसाठी सैन्यदलात भरती होण्यासाठी मुलींनी तयार रहावे.

- राखी माणिकराव साळवे, महिला सैनिक, पिंप्री आंधळे

राखी एक वर्षाची असताना मित्राकडे सैनिकाची वर्दी पाहिली होती. त्यावेळी त्याला सांगितले होते मुलीला एक दिवस याच वर्दीत पाहिल आणि ते स्वप्न आज 23 वर्षांनी पूर्ण झाले. गरीब कुटुंब असल्याने सायकलीवर रांगोळी, फुगे विकून मुलीचे शिक्षण पूर्ण केले. आज दोन भावंडांसह मुलीने नाव रोषण केल्याचा सार्थ अभिमान आहे.

- माणिकराव साळवे, राखीचे वडील, पिप्री आंधळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com