esakal | मेडीकलवर पोहोचलेल्या रेमडेसिव्हिरचा घोळ कायम

बोलून बातमी शोधा

मेडीकलवर पोहोचलेल्या रेमडेसिव्हिरचा घोळ कायम
मेडीकलवर पोहोचलेल्या रेमडेसिव्हिरचा घोळ कायम
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : अकोल्यात पोहोचलेल्या ९० रेमडेसिव्हिर इंजेक्शन प्रकरणाची चौकशी अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केली आहे. इंजेक्शन खरेदीच्या व्यवहाराची माहिती घेण्याऐवजी अन्न व औषध प्रशासनाकडून दस्तऐवज उपलब्ध नसल्याचे सांगून पोलिस अज्ञात नावाने पोलिस तक्रार करण्यात आली. यावरून कुणाला तरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बालाजी मेडिकलच्या नावाने त्यांच्या जीएसटी व औषध विक्री परवाना क्रमांकासह ९० रेमडेसिव्हर इंजेक्शन पोहोचले. मात्र, हे पार्सल आपले नसल्याचे सांगून मेडिकल संचालकांनी हात वर करीत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती दिली. अन्न औषध प्रशासन विभागाने इंजेक्शन खरेदीबाबत कोणतीही ठोस माहिती न घेता रामदासपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरुद्ध तक्रार करून या प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा: एक कोटी देतो रेमडीसिव्हर द्या, मी फुकट वाटतो

एकीकडे रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी त्यांचे नातेवाई रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या शोधात दारोदार फिरत असताना अन्न व औषध प्रशासन ९० रेमडेसिव्हिरच्या चौकशीबाबत दाखव असलेल्या निष्काळजीपणाने या प्रकरणात संशयाचा वास येऊ लागला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात तपास रामदासपेठ पोलिस नेमके गौडबंगाल शोधण्यात कितपत यशस्वी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे मागितला १० लाखांचा हप्ता!

औषध विक्रेते व कंपनीहीची चौकशी व्हावी!

या प्रकरणात पार्सल ज्या कुरिअर कंपनीने आले त्या कुरिअर कंपनीसह हैदराबाद येथील कंपनीची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती रामदासपेठ पोलिसांनी दिली. त्यासोबतच ज्या नावाने व ज्यांच्या जीएसटी व औषध विक्री परवान्यासह हे पार्सल आले त्या औषध विक्रेत्यांचीही कसून चौकशी झाल्यास यातून इंजेक्शनचा काळाबाजार करणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकू शकतात.

हेही वाचा: दोन खासदार, सहा आमदार तरीही जनता बेजार!

एलसीबीकडून तपासाची मागणी

रेमडेसिव्हर इंजेक्शनच्या चुकलेल्या पत्त्याचा घोळ उघडकीस आणूण इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना उजेडात आणण्यासाठी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी केली आहे.

संपादन - विवेक मेतकर