दारू सोडविण्यासाठी निघालेल्या व्यक्तींवर काळाचा घाला; भीषण अपघातात पाच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Five people Died in Road Accident at buldhana

दारू सोडविण्यासाठी निघालेल्या व्यक्तींवर काळाचा घाला; अपघातात पाच ठार

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) : दारू सोडविण्यासाठी शेगाव तालुक्यातील गावाकडे निघालेल्या बोलेरो व ट्रक यांची समोरासमोर धडक (Road Accident) झाली. या भीषण अपघातात बोलोरोमधील पाच जण ठार (Five people Died) झाले तर सात जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी (ता. १४) पहाटे पाच वाजताच्या सुमारास जालना बायपास टी पॉइंटवर घडला. जखमींना जालना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. (Five people Died in Road Accident at buldhana)

प्राप्त माहितीनुसार, अपघातात श्रीमंत अर्जुन पाडमुख (वय ४५), अर्जुन जयवंत पाडमुख (वय ६०), कांताबाई अर्जुन पाडमुख (वय ५५) तिघे राहणार रोहनवाडी, चालक आकाश गरीबदास लिहिणार (वय २१) व कुलदीप अर्जुन गायकवाड (वय ३२) हे जागीच ठार झाले तर आम्रपाली विठ्ठल पाडमुख, अशोक लिहिणार, मीनाबाई श्रीमंत पाडमुख, तुकाराम बाबूराव खांडेभराड, मीराबाई परमेश्वर बाळराज, बाबूराव श्रीपत कापसे व परमेश्वर कचरूबा बाळराज हे गंभीर जखमी झाले.

हेही वाचा: ...तर आम्ही तिघेही राजीनामा देण्यास तयार; सोनिया गांधींनी केलं स्पष्ट

जालना तालुक्यातील रोहनवाडी येथील लिहिणार व पाडमुख कुटुंब एकाची दारू सोडविण्यासाठी शेगाव तालुक्यातील धार्मिक स्थळी जात होते. देऊळगाव राजा शहराकडे येत असताना जालना बायपास ते चिखली मार्गाकडे वळत असताना त्यांची भरधाव बुलेरो क्रमांक एमएच २८ व्ही ४४२१ समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच १६ क्यू ५६८२ वर (Road Accident) आदळली. यातच नमूद व्यक्तींचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिकाचे डॉक्टर अक्षय गुट्टे, चालक संदीप बुधवत, अमोल कबाडे व हनुमान जायभाय आदींनी घटनास्थळ गाठून मृत व गंभीर जखमींना बोलेरोमधून बाहेर काढले. यानंतर रुग्णवाहिकेतून प्रथम गंभीर जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविले. तिथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. पोलिसांनी (Police) मृत चालक आकाश गरीबदास लिहिणार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Road Accident Five People Died Crime News Buldhana District Jalna

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top