esakal | आरटीई प्रवेश; दाेन दिवसात ७२१ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीई प्रवेश; दाेन दिवसात ७२१ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे आव्हान

आरटीई प्रवेश; दाेन दिवसात ७२१ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे आव्हान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत (आरटीई) शाळा प्रवेशासाठीच्या प्रक्रियेला ता. ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही प्रवेशाची गती वाढली नसल्याने दाेन दिवसात ७२१ विद्यार्थअयांचे प्रवेश निश्चित करण्याचे आव्हान शाळांपुढे आहे. त्यामुळे पहिल्यानंतरही काही जागा शिल्लक राहण्याची भिती आहे. आतापर्यंत एक हजार २३९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. (RTE admission; Challenge for admission of 721 students in two days)

हेही वाचा: मोबाईलवर बोलताना वेगात आलेल्या ऑटोच्या अपघातात युवतीचा मृत्यू

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यंदा आरटीई कोट्यातून प्रवेश मिळावण्यासाठी चार हजार ७२७ ऑनलाईन अर्ज करण्यात आले होते. प्रवेशासाठी पहिली साेडत ता. ७ एप्रिल रोजी पुणे येथे ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आली. आरटीई प्रवेश मुदतीबाबत शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना ३० जून राेजी मुदत वाढीचा अादेश पाठवला हाेता. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांना ओटीपीच्या तांत्रिक कारणांमुळे ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यास विलंब हाेत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियाला ता. ९ जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली.

हेही वाचा: गावावर शोककळा; शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

अकोला जिल्ह्यातील आरटीई प्रवेशाची स्थिती
- नोंदणीकृत शाळा - २०२
- प्रवेशासाठी प्राप्त अर्ज - ४७०७
- आरक्षित जागा - १९६०
- प्राप्त अतिरिक्त अर्ज - २७४७
- आतापर्यंत निवड झालेले - १८१७
- तात्पुरते प्रवेश - ५६९
- निश्चित प्रवेश - १२३९

संपादन - विवेक मेतकर

RTE admission; Challenge for admission of 721 students in two days

loading image