esakal | RTE: प्रवेशाला पुन्हा लॉकडाउनचा फटका!
sakal

बोलून बातमी शोधा

RTE: प्रवेशाला पुन्हा लॉकडाउनचा फटका!

RTE: प्रवेशाला पुन्हा लॉकडाउनचा फटका!

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

अकोला : शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत (आरटीई) शाळा प्रवेशासाठीची प्रक्रिया सोमवार (ता. १९) पासून सुरू होणार होती. परंतु राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासंदर्भात लॉकडाऊन संपल्यानंतर आरटीईच्या संकेतस्थळावर (पोर्टल) सूचना दिली जाईल.

परिणामी पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षीही आरटीई प्रवेशाला लॉकडाऊनचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: Video: थरारक; आई-मुलाची आत्महत्या, वडिलांनीही पोलिस ठाण्यात घेतले विषबालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) २०१९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.

हेही वाचा: अकरा रेल्वे गाड्या रद्द; प्रवाशांना फटका

गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते; मात्र आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे.

हेही वाचा: श्वास कंठाशी; खासगीत ‘नो ऑक्सीजन बेड’!

यंदा आरटीई कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी ४ हजार ७२७ ऑनलाईन अर्ज करण्यात आले. क्षमतेपेक्षा जास्त १ हजार ९६० अर्ज आले आहेत.

हेही वाचा: VIDEO: भाजप आमदार दारु पिऊन कुठेही पडतो, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा घसरली

हे सर्व अर्ज छाननीमध्ये पात्र ठरल्यास तब्बल २ हजार ७६७ विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. दरम्यान प्रवेशासाठीची पहिली सोडत निघाल्यानंतर सोमवारपासून प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार होती, परंतु तिला लॉकडाउनचा फटका बसला आहे.

संपादन - विवेक मेतकर