‘बीटी’च्या पाकिटातून प्रतिबंधित ‘एचटी-बीटी’ बियाण्यांची विक्री

‘बीटी’च्या पाकिटातून प्रतिबंधित ‘एचटी-बीटी’ बियाण्यांची विक्री

अकोला ः जिल्ह्यात बीटी कपाशी बियाण्यांच्या पाकिटातून प्रतिबंधित एचटी-बीटी बियाण्यांची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीटी बियाण्यांच्या पाकिटातील बियाण्यांचे नमूने प्रयोगशाळेत तपासले असता त्यामध्ये ‘एचटी-बीटी’चे जीन आढळल्याने कृषी विभागात खळबळ उडाली आहे. त्यामुळे या प्रकरणी प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर संबंधित कंपनी व विक्रेत्या विरोधात कृषी विभागामार्फत कोणती कारवाई करण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sale of banned 'HT-BT' seeds from BT bags in Akola)

जिल्ह्यात अधून-मधून पाऊस होत असल्यामुळे शेतकरी कृषी सेवा केंद्रांमधून बियाण्यांंसह खतांची खरेदी करत आहेत. त्यामुळे सर्वत्र खरीपाची लगबग पाहायला मिळत आहे. दरम्यान शहरातील एका कृषी सेवा केंद्रातील बीटी बियाण्यांच्या (कापूस) पाकिटातून प्रतिबंधित एचटी-बीटी बियाण्यांची विक्री करण्यात आली आहे. कृषी विभागाने सदर पाकिटातील बियाणे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असता बियाण्यांमध्ये ‘एचटी-बीटी’ कपाशीचा जीन आढळला आहे. त्यामुळे कृषी विभागात खळबळ उडाली असून प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल मिळताच प्रतिबंधित बियाण्यांची बनवाबणवी करुन विक्री करणाऱ्या कंपनी विरोधात कृषी विभागाचे अधिकारी काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘बीटी’च्या पाकिटातून प्रतिबंधित ‘एचटी-बीटी’ बियाण्यांची विक्री
कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू; २९ जण नवे पॉझिटिव्ह


‘एचटी-बीटी’ला मान्यता नाही

‘एचटी-बीटी’ कापूस बियाण्यास जेनेटीक इंजिनिअरींग ॲप्रुवल कमेटीची मान्यता नसल्यामुळे सदरचे बियाणे वैध ठरत नाही. शासनाची मान्यता नसलेले व बेकायदेशीरीत्या निर्माण केलेल्या ‘एचटी-बीटी’ बियाण्यांमुळे पर्यावरणाची हानी होते. याकरीता सदरच्या बियाण्याची जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी खरेदी, विक्री, वापर, साठवणूक व पेरणी करु नये, असे आवाहन कृषी विभागाच्या मार्फत वेळोवेळी करण्यात येते.

‘बीटी’च्या पाकिटातून प्रतिबंधित ‘एचटी-बीटी’ बियाण्यांची विक्री
दुबार पेरणीचे संकट; कुठे अवर्षण, तर कुठे बियाणे कुजले


बंदी झुंगारुन पेरणीचे प्रयोग
जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून एचटी-बीटी संदर्भात शासनाने लावलेली बंदी झुंगारुन काही शेतकरी बीटी-बियाण्यांची लागवड करत आहेत. त्यामुळे संबंधितांवर कृषी विभागाने कारवाई सुद्धा केली आहे. दरम्यान आता नव्याने आढळलेल्या प्रकरणात कृषी विभाग काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘बीटी’च्या पाकिटातून प्रतिबंधित ‘एचटी-बीटी’ बियाण्यांची विक्री
नव्‍वद टक्‍के शिवसेना आमदारांची खदखद सरनाईकांनी पत्रात मांडली


बीटी-बियाण्यांच्या एका पाकिटातून बियाण्यांचे नमूने तपासणीसाठी घेतले असता त्यामध्ये एचटी-बीटीचे जीन आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रयोगशाळेतून अहवाल मिळताच कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
- मुरलीधर इंगळे
जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला

संपादन - विवेक मेतकर

Sale of banned 'HT-BT' seeds from BT bags in Akola

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com