Corona Update Akola : सलग दुसऱ्या दिवशी १९६ कोरोनाचे पॉझिटिव्ह!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात १५४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
second day 196 Corona Positive
second day 196 Corona Positive sakal
Updated on: 

अकोला : कोरोना संसर्ग (corona virus) तपासणीचे (RT-PCR test) ६७१ अहवाल प्राप्त झाले. त्यात १५४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह (Corona Positive) आले, तसेच खाजगी लॅब मधून नऊ असे एकूण १६३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ३३ असे एकूण पॉझिटिव्ह १९६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. मंगळवारीसुद्धा अकोला जिल्ह्यात १९९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. (Akola Corona and omicron Update)

second day 196 Corona Positive
शिर्डीत कोविड रुग्णालय सुरू करा : लोखंडे

बुधवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात १५४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात ११८ महिला व ३६ पुरुष रुग्ण आहेत. त्यातील ११६ जण हे अकोला शहरातील, अकोट तालुक्यातील १३, मूर्तिजापूर येथील ११, अकोला ग्रामीण येथील सात, बार्शीटाकळी येथील चार, बाळापूर येथील तीन रहिवासी आहेत. खाजगी लॅबच्या अहवालात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.

second day 196 Corona Positive
ऑनलाइन शिक्षणापेक्षा देशी दारूचा परवाना द्या

४८ जणांना डिस्चार्ज

बुधवारी दिवसभरात होम आयसोलेशन येथून ४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

७३५ जणांवर उपचार सुरू

जिल्ह्यात सद्यस्थितीत ७३५ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील बहुतांश रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com