बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक

फुटलेल्या नेत्यांवर हल्लाबाेल; श्रीराम मंदिरात महाआरती; बंडखोरांचे फलक काढले
Shiv Sainik aggressive after Shiv sena MlA rebel
Shiv Sainik aggressive after Shiv sena MlA rebel

अकोला - शिवसेनेतील बंडखोरीनंतर जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे रविवारी (ता. २६) दिसून आले. आमदार नितीन देशमुख यांच्या संपर्क कार्यालयावर बंडखाेर नेते ना. एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील यांची छायाचित्रे असलेले फलक काढण्यात आले. त्यानंतर दुपारी मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ टिळक राेडवरील माेठ्या राम मंदिरासमाेर शिवसैनिकांनी महाआरती केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात शिवसेनेेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. साेमवारी (ता. २७) सकाळी भव्य पदयात्रा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

महाराणा प्रताप चाैकात जोरदार घोषणाबाजी

महाआरतीनंतर राम मंदिरापासून जवळच असलेल्या महाराणा प्रताप चाैकात (सिटी काेतवाली) शिवसैनिक पोहचले. याठिकाणी शिवसैनिकांनी शिवसेना, पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घाेषणा दिल्या. काेणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता.

राममंदिरात महाआरती; बंडखाेरांना सद्‍बुद्धी देण्याची मागणी

अकोला : शिवसेनेने रविवारी (ता. २६) दुपारी श्रीरामाला साकडे घालत महाआरती केली. शिवसेना आणि मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ टिळक राेडवरील माेठ्या राम मंदिरासमाेर शिवसैनिकांनी ही महाआरती करण्यात आली. त्यामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनेत झालेल्या बंडखाेरीमुळे स्थानिक शिवसैनिक रविवारी (ता. २६) आक्रमक झाले. पक्ष प्रमुखांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी टिळक रोडवरील राममंदिरात महाआरती केली. बंडखाेर मंत्री, आमदारांवर शिवसेनेच्या नेत्यांनी महाआरतीनंतर टीका केली.

यावेळी माजी आमदार गाेपिकिशन बाजाेरीया, आमदार विप्लव बाजाेरीया, श्रीरंग पिंजरकर, अकाेला पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, पूर्वचे प्रमुख अतुल पवनीकर, मुकेश मुरुमकार, तरूण बगेरे, संताेष अनासने, सागर भारुका, शशिकांत चाेपडे, गजानन बाेराळे, महिला नेत्या ज्याेत्सना चाेरे, मंजुषा शेळके, अविनाश माेरे, शशिकांत चाेपडे, युवा सेनेचे याेगेश बुंदेले, देवीदास बाेदडे आदी उपस्थित हाेते.

बैठकीत बंडखाेरांवर हल्लाबाेल; आज पदयात्रा

अकोला : शिवसेना, पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ साेमवारी (ता. २६) पदयात्रा काढण्याचा निर्णय २६ जून राेजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी फुटलेल्या आमदारांवर हल्लाबोल केला. शिवसेनेतील बंडानंतर आमदार नितीन देशमुखसह काही नेत्यांनी शिवसैनिकांसोबत २६ जून राेजी शासकीय विश्रामगृहात संवाद साधला. बैठकीला सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथाेड, जिल्हा प्रमुख गाेपाल दातकर, विजय मालाेकार, राजेश मिश्रा, राहुल कराळे, जि.प. सदस्य प्रशांत अढाऊ, संजय अढाऊ, गाेपाल भटकर, गजानन विझरे, नितीन ताकवाले, दिलीप बाेचे, विकास पागृत, ज्ञानेश्वर गावंडे, दिनेश सराेदे आदींसह, महिला आघाडी नेत्या, नगरसेवक, तालुका प्रमुखांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित हाेते.

सेना आमदारांच्या कार्यालयावरील फलक हटविले

अकोला ः शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या संपर्क कार्यालयावर मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील यांचे छायाचित्रे असलेले फलक शनिवारी (ता. २५) रात्री उशिरा काढण्यात आले. नेलकेस राेडवरील एलआरटी वाणिज्य महाविद्यालयासमोर आमदार नितीन देशमुख यांचे संपर्क कार्यालय आणि जिल्हा संपर्क कार्यालयावरील एक वगळता तीन फलक काढण्यात आले. या फलकांवर बाळाबाहेब ठाकरे, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेते आणि बंडखाेर नेते ना. एकनाथ शिंदे, त्यांच्यासाेबत असलेले पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची छायाचित्रे हाेती. केवळ एकाच फलकावर बाळासाहेब ठाकरे यांचा एकच फाेटाे हाेता. हा फलक वगळता अन्य फलक काढण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com