esakal | ‘सिंदखेड राजाच्या राजवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या’
sakal

बोलून बातमी शोधा

supriya sule

‘सिंदखेड राजाच्या राजवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या’

sakal_logo
By
गजानन काळुसे

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) :  जिजाऊ जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक सिंदखेड राजा नगरीतील स्मारकांना राष्ट्रीय स्मारकांचा दर्जा दिला जावा अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲड नाझेर काझी यांनी केली आहे. या संर्दभात काझी यांनी खासदार सुप्रीया सुळे यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत शहरातील ऐतिहासिक स्मारकांचे छायाचित्रांसह दस्तऐवज त्यांनी सुळे यांना दाखविले येत्या काही दिवसात शहरातील या संपुर्ण स्मारकांची पाहणी करण्यासाठी सुप्रीया सुळे स्वत: शहरात येणार असल्याचे ॲड नाझेर काझी यांनी सांगीतले.

शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहीती दिली असुन शहराचा सर्वांगीन विकास करतांना आपल्याला ऐतिहासिक स्मारकांकडे दुलर्क्ष करता येणार नसल्याचे ते म्हणाले ९ सप्टेंबर रोजी नाझेर काझी, नरेश शेळके यांनी सुप्रीया सुळे यांची मुंबई येथे भेट घेतली या भेटीत १९८१ मध्ये तत्कालीन म़ुख्यमंत्री ए आर अंतुले यांनी तत्कालीन खासदार बाळकृष्ण वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली सिंदखेड राजा विकासासंदर्भात समिती स्थापन केली होती.

हेही वाचा: डॉ. दिलीप मालखेडेंची अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

देशातील अव्दीतीय समाधीस्थळांपैकी राजे लखुजीराव जाधव यांची समाधी उल्लेखीत केली गेली आहे १०० कोटीच्या निधीमधुन राष्ट्रीय स्मारकांचे संर्वधन व सौर्दयीकरन शहराचा विविध अंगी विकास असे या अहवालात नमुद करण्यात आले आहे,याच संदर्भात खासदार सुप्रीया सुळे यांचेशी चर्चा झाली असुन शहरातील १३ ऐतिहासिक स्मारकांच्या जतन व संर्वधानाच्या संदर्भात राज्य व केंद्रीय पुरातत्व विभागाशी संपर्क साधुन योग्य तो मार्ग काढण्याबाबत त्यांनी अश्वासित केल्याचे काझी यांनी सांगीतले.

या विषयात आगामी संसदेच्या अधिवेशनात आपण विषय मांडणार असल्याचेही खासदार सुप्रीया सुळे यांनी सांगीतल्याचे ॲड नाझेर काझी म्हणाले सदर पत्रकार परिषदेमध्ये विजय तायडे,तालुका अध्यक्ष शिवाजी राजे जाधव, शहर अध्यक्ष राजेंद्र अभोंरे, संभाजी पेटकर, जगन सहाने,ॲड.संदीप मेहेत्रे, यासिन शेख ,कैलास मांटे उपस्थित होते.

हेही वाचा: शिक्षण सभापतींचे अध्यक्षांना आव्हान! वाद चव्हाट्यावर

ऐतिहासिक स्थळांची  खासदार सुप्रीया सुळे करणार पाहणी

शहरांमध्ये असलेल्या ऐतिहासिक स्थळाची पाहणी खासदार सुप्रियाताई सुळे करणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये खासदार सुप्रियाताई सुळे या स्वतः सिंदखेड राजा शहरांमध्ये येऊन शहरांमध्ये  असलेल्या मराजमाता माँ जिजाऊ यांचे जन्म स्थळ असलेला लखुजीराजे यांचा राजवाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजी राजांची समाधी, पुतळा बारव, सजना बारव, चांदणीतलाव, मोतीतलाव यासह अनेक ऐतिहासिक वास्तूंची स्वतःला पाहणी करून त्या संदर्भात माहिती जाणून घेऊन केंद्र व राज्य सरकारकडे ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

loading image
go to top