esakal | सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तात्काळ सुरू करा, माजी गृहराज्यमंत्र्यांची मागणी

बोलून बातमी शोधा

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तात्काळ सुरू करा, माजी गृहराज्यमंत्र्यांची मागणी

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तात्काळ सुरू करा, माजी गृहराज्यमंत्र्यांची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोविड १९ चा वाढता संसर्ग पाहता गेली कित्येक दिवसापासून तैयार असलेले अध्यावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नॉन कोविड रुग्णासाठी तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी माजी पालकमंत्री डॉ. रणजिट पाटील यांनी केली. त्यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रभावावर जीएमसीमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

माजी पालकमंत्री व आमदार डॉ. रणजित पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड १९ च्या वॉर्डांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन रुग्णांची विचारपूस केली. व्हेटिंलेटरची सुविधा, आयसीयू वॉर्ड, ऑक्सिजन प्लांटची पाहणी, रुग्णालयातील रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्धता, रुग्णालयातील ४५० कोविड रुग्णांच्या बेड च्या प्रमाणात सिटी स्कँनचे प्रमाण वाढविणे, रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी व्हिडीओ कॉन्फरसिंगची सुविधा उपलब्ध करणे, रुग्णाच्या नातेवाईकांसाठी कौन्सिलिंगची सुविधा करणे इत्यादी बाबींवर चर्चा करून प्रशासनाला योग्य निर्देश दिले.

यावेळी डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. अष्टपुत्रे, डॉ. सिरसाम, डॉ. नेताम, भाजपाचे डॉ. अशोक ओळंबे, नगरसेवक हरिश अलीमचंदानी, अभ्यागता समिती सदस्य दीपक मायी, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश पदाधिकारी हाजी चांदखा, भाजपा जिल्हासदस्य संजय चौधरी, नगरसेवक आशीष पवित्रकार, सचिन पाटील, आशीष शर्मा, जमीर खान, भवानी प्रताप यांची उपस्थिती होती.

संपादन - विवेक मेतकर