भाजीबाजार, घरकुलावरून ‘बजेट’च्या सभेत वादळी चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stormy discussion in Akola Municipal Corporation's annual budget

भाजीबाजार, घरकुलावरून ‘बजेट’च्या सभेत वादळी चर्चा

अकोला ः महानगरपालिकेचे २०२१-२२ चे ३२.४४ कोटीच्या शिलकीच्या मूळ अंदाजपत्रकाला मंगळवारी ऑनलाइन सभेत मंजुरी देण्यात आली. जनता भाजी बाजारातील व्यापारी संकुल आणि घरकुल लाभार्थ्यांबाबत अंदाजपत्रकातील तरतुदीवरून या ऑनलाइन सभेत वादळी चर्चा झाली. Stormy discussion in Akola Municipal Corporation's annual budget

अकोला महानगरपालिकेचे २०२०-२१ चे सुधारित आणि २०२१-२२ चे मूळ अंदाजपत्रक मंगळवारी स्थायी समिती सभापती संजय बडोणे यांनी महापौर अर्चना मसने यांच्याकडे सोपविले. त्यानंतर सभेत विविध हेडवर करण्यात आलेल्या तरतुदीबाबत सदस्यांनी चर्चा केली. मनपाचे एकूण उत्पादन ६०७.२३ कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आले असून, खर्च ५७१.५५ कोटी अपेक्षित आहे. त्यानुसार ३२.४४ कोटी रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक महासभेने मंजूर केले. यावेळी सदस्यांनी उत्पन्न वाढीसाठी काही सूचनाही केल्यात.

हेही वाचा: एक कोटी देतो रेमडीसिव्हर द्या, मी फुकट वाटतो

प्रस्तावित वाणिज्य संकुलातून ७५ कोटीचे उत्पन्न

स्थायी समितीने सूचविल्यानुसार महानरपालिकेतर्फे बीओटी तत्वावर जनता भाजी बाजार व जुने बस स्थानक परिसरात उभारण्यात येत असलेल्या वाणिज्य संकुलातून ७५ कोटीचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असून, त्याचा अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे. यावर विरोध पक्ष नेते साजिद खान पठाण, शिवसेना गटनेते राजेश मिश्रा, काँग्रेसचे नगरसेवक मो. इरफान, राष्ट्रवादी काँग्रेसच् अ.रहिम पेंटर आदींनी आक्षेप घेतला. राजेश मिश्रा यांनी ही तरतुद म्हणजे ‘गाव बसा नही और लुटेरे तयार’ अशा शब्दात केली. चर्चा नाकारल्यामुळे साजिद खान पठाण यांनी सभेवर बरिष्काराचा इशाराही दिला होता.

हेही वाचा: पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!

घरकुलावरून वादंग

शहरातील घरकुल लाभार्थिंना पैसे दिले जात नसल्यामुळे अनेकांची घरे अर्धवट आहे. त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत वंचित बहुजन आघाडीच्या किरण बोराखडे, शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका व सत्ताधारी भाजपचे नगरसेवक हरीश काळे यांना प्रशासनाला जाब विचारला. आधीच्‍या घरकुलाचे पैसे दिले नसता नवीन ६०० घरकुल प्रस्तावित करून १५ कोटीची तरतुद करण्याला उद्देश काय, असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केला. त्यावर अधिकाऱ्यांनी नियमानुसार तरतुद केल्याची माहिती दिली.

संपादन - विवेक मेतकर

Stormy discussion in Akola Municipal Corporation's annual budget

Web Title: Stormy Discussion In Akola Municipal Corporations Annual

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top