esakal | इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांची कोंडी! वाचा काय आहे प्रकरण
sakal

बोलून बातमी शोधा

school student akola.jpg

कोरोनाच्या पार्वभूमीवर सध्या शाळांमधून देण्यात येणारे शिक्षण बंद आहे. परंतु शाळा टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्याअंतर्गत इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्ट व तिसरी ते पाचवीचे वर्ग सप्टेंबर महिन्यापासून सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठीची कार्यवाही सुद्धा शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. परंतु विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासंदर्भाच्या प्रक्रियेला कोरोना ग्रहण लागले आहे. परिणामी टाळेबंदीच्या काळापासून जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारापासून वंचित रहावे लागत आहे. 

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांची कोंडी! वाचा काय आहे प्रकरण

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला : कोरोनाच्या पार्वभूमीवर सध्या शाळांमधून देण्यात येणारे शिक्षण बंद आहे. परंतु शाळा टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्याअंतर्गत इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्ट व तिसरी ते पाचवीचे वर्ग सप्टेंबर महिन्यापासून सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठीची कार्यवाही सुद्धा शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. परंतु विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासंदर्भाच्या प्रक्रियेला कोरोना ग्रहण लागले आहे. परिणामी टाळेबंदीच्या काळापासून जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारापासून वंचित रहावे लागत आहे. 

विदर्भात 26 जूनपासून शैक्षणिक सत्राला दरवर्षी सुरुवात होते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा केव्हा सुरू होतील, याचे निश्‍चित वेळापत्रक नाही. दुसरीकडे कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्यासंदर्भात शासन स्तरावरुन संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाला देण्यात आले आहे. त्याअंतर्गत टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना गणवेशासाठी सानुग्रह अनुदान व पाठ्यपुस्तक उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु यासर्व प्रक्रियेनंतर सुद्धा शालेय पोषणासंदर्भात शासन व प्रशासन स्तरावरून कोणत्याच प्रकारच्या घडामोळी व निर्देश प्राप्त न झाल्याने विद्यार्थ्यांना ना शिक्षण मिळत आहे ना पोषण आहार मिळत आहे. परिणामी शालेय विद्यार्थ्यांना कुपोषणाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढणाऱ्या पोषणाला सुद्धा कोरोना ग्रहण लागल्याचे दिसून येत आहेत. 

घरपोच वाटपाला सुद्धा ब्रेक 
विद्यार्थ्यांना घरपोच पोषण आहार पुरवण्याचा मार्ग शालेय शिक्षण विभागाकडे उपलब्ध आहे. याच मार्गाचा अवलंब करत मार्च महिन्यात एप्रिल महिन्यासाठी विद्यार्थ्यांना घरपोच तांदुळ व डाळीचे वाटप करण्यात आले. परंतु त्यानंतर मे व जून महिन्यात मात्र घरपोच वाटपाला ब्रेक लावण्यात आला. 

अशी आहे स्थिती (2019 च्या संचमान्यतेनुसार) 
- जिल्ह्यात शासकीय शाळा, महापालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद, खाजगी, आश्रम शाळांची संख्या 1 हजार 228 आहे. या शाळांमध्ये गत वर्षी वर्ग 1 ते 5 चे 91 हजार 415 विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यांना मार्च, एप्रिलपर्यंत पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. 
-  जिल्ह्यात वर्ग 6 ते 8 शाळांची संख्या 782 आहे. या वर्गांमध्ये 63 हजार 284 विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यांना मार्च, एप्रिलपर्यंत पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. 
- मार्च व एप्रिलमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना घरपोच पोषण आहाराचे तांदुळ व डाळी देण्यात आल्या. परंतु त्यानंतर पोषण आहार गायब झाल्याचे वास्तव आहे.