Everest Base Camp : साठीतील दोघींचा महापराक्रम; एव्हरेस्ट बेस कॅम्पवर केली यशस्वी चढाई

Everest Base Camp
Everest Base Camp

अकोला : येथील डॉ. अंजली राजेंद्र सोनोने आणि सुरेखा दिलीप सोनोने या एकाच कुटुंबातील दोन साठीतील महिलांनी जगातील अतिशय खडतर, धोकादायक अशा एव्हरेस्ट बेस कॅम्पची गिर्यारोहणाची खडतर मोहीम ३ मे २०२३ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण करून अकोल्याच्या गिर्यारोहण मोहिमेत एक नवा इतिहास रचला.

ज्या अकोला जिल्ह्याला दोन सक्षम महिला अधिकारी लाभल्या त्या जिल्ह्यातील ह्या दोन महिलांनी एकाच वेळी अशी धाडशी मोहीम फत्ते करणे ही एक राजराजेश्वर नगरीसाठीच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. यांच्यासोबत डॉ. राजेंद्र सोनोने यांनी सुद्धा या गिर्यारोहणाच्या मोहिमेत भाग घेऊन एकाच कुटुंबातील तिघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करण्याची ही अकोलेकरांसाठी प्रथमच वेळ आहे.

Everest Base Camp
Water Source : पठारी भागातील बारमाही वाहणारा नैसर्गिक झरा; अनेक कुटुंबांची भागते तहान

विशेष म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करतानाचा प्रसंग त्यांनी फेसबुकवर लाईव्ह दाखवून सर्व मित्रमंडळींना या ऐतिहासिक क्षणाच्या आनंदात सहभागी केले. या त्रयीने ही मोहीम २६ एप्रिल रोजी लुक्ला या नेपाळमधील हिमालयाच्या अत्यंत दुर्गम भागातील गावातून सुरू केली होती.

लुक्ला, फाकडींग, नामचे बजार, तेंगबोचे, देबोचे, फेरीचे, दिंगबोचे, लोबुचे, गोरखशेप, काला पत्थर असे खडतर गिर्यारोहण मजल दरमजल करीत ता. ३ मे रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्पला ही त्रयी यशस्वीरीत्या पोहोचली. एव्हरेस्ट बेस कॅम्प हा समुद्रसपाटीपासून ५३६४ मीटर एवढ्या उंचीवर आहे, जेथे वर्षभर चोहोबाजूंनी बर्फचबर्फ असून, उणे २० डिग्री सेल्सिअस तापमान असते.

हिमालयातील या अतिशय दुर्गम भागात कधी खडकाळ तर कुठे दरीच्या अगदी काठावरून जात ही मोहीम फत्ते करण्यासाठी खूप मोठे धाडस लागते. जसे जसे समुद्रसपाटीपासून वर जातो तसतशी हवा विरळ होऊन प्राणवायुचे प्रमाण खुप कमी व्हायला लागते. एक एक पाऊल टाकायला येथे दम लागतो. निसर्गाच्या लहरीपणाचा गिर्यारोहकांना येथे खूप अनुभव येतो.

सोनोने कुटूंबियांना सुद्धा या सर्व विपरित परिस्थितींचा सामना करावा लागला. पण न डगमगता, हिमतीने त्यांनी प्रसंगी सतत कोसळणाऱ्या पावसात आणि सतत होणाऱ्या हिमवर्षावात, उणे २० डिग्री तापमानातही आपली मोहीम ८ दिवसात यशस्वीरित्या फत्ते केली आणि एव्हरेस्ट बेस कॅम्पवर तिरंगा मोठ्या दिमाखात फडकवला.

Everest Base Camp
Uddhav Thackrey: '…मोठ्या प्रतिसादानंतरही वज्रमुठ सभा का थांबवल्या', उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

या मोहिमेदरम्यान समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर गेल्यामुळे ॲक्युट माऊन्टेन सिकनेस नावाचा जिवघेणा आजार होण्याची शक्यता असते. तो होऊ नये म्हणून या मोहिमेत नामचे बजार आणि दिंगबोचे या दोन ठिकाणी शरीराची त्या उंचीसाठी अनुकुलता यावी, कमी प्राणवायुतही दुर्गम भाग चढता यावा यासाठी ॲक्लिमटायझन किंवा अनुकुलता ट्रेक सुद्धा त्यांनी केला. पाठीवर १० ते १५ किलोचे ओझे घेवून दररोज १० ते १२ तास हिमालय चढत जाण्याचे दिव्य या तिघांनी वयाच्या साठीत असताना करून तरूण पिढीला एक मोठा आदर्श घालून दिला.

विशेष बाब म्हणजे ही मोहीम त्यांनी स्वतःहून आखली, त्यात कुठल्याही प्रवासी कंपनीचा सहभाग नव्हता. या मोहिमेदरम्यान त्यांनी सर्व आवश्यक बाबींचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे आतापर्यंतचा त्यांचा ट्रेक कुठलेही गालबोट न लागता निर्धोक झाला.

हा ट्रेक फत्ते करण्यासाठी विशेष तयारीसाठी त्यांना मुंबई येथील डॉ. रमेश कदम, नाशिक येथील महाजन बंधू, अजिंक्य फिटनेस पार्कचे संचालक धनंजय भगत, स्वतःचे ट्रेनर अर्जून पाटील आणि काठमांडू येथील त्यांचे मॅराथॉन मित्र शेर थारू यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले, याचा त्यांनी मोबाईलवर मुलाखत घेताना विशेष उल्लेख केला.

विशेष म्हणजे डॉ. अंजली आणि सुरेखा यांचा हा आयुष्यातील पहिला ट्रेक असून सुद्धा त्यांनी दृढ निश्चयाने तो यशस्वीरित्या पुर्ण केला. डॉ. राजेंद्र सोनोने हे अकोला जिल्ह्यातील पहिले फक्त आयर्न मॅनच नसून एव्हरेस्ट बेस कॅम्प पेक्षा ३०० मीटर अधिक उंचावर असलेल्या लेह येथील खरदुंगला पास सायकलने सर करणारे पहिले सायकलस्वार आहेत. ही अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

सोनोने कुटूंबिय व त्यांचा मित्रपरिवार गेल्या जवळजवळ दोन दशकांपासून सायक्लोनच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात सायकलचा वापर वाढावा यासाठी सतत प्रयत्नशिल असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com