आरोग्य विभागाच्या कारभारावर ओढले ताशेरे

- जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा
akola zp
akola zpfile photo

अकोला ः ग्रामीण भागातील आरोग्य (Health in rural areas) सुद्धा पार ढासळली आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात Corona vaccination सुद्धा खोळंबा निर्माण होत आहे, असा आरोप जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी (ता. ७) शिवसेनेचे सदस्य गोपात दालकर यांनी केला.

त्यावर बचावात्मक उत्तर देत जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) सुरेश आसोले यांनी कोरोनाच्या काळात आरोग्य विभाग अहोरात्र काम करत असल्याचे सांगितले. त्यासाठी इतर विभागाही मदत करत असल्याचे डीएचओ म्हणाले. आरोग्य विभागाच्या विषयावर सत्ताधारी पक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे स्थायी समितीच्या सभेत आरोग्य विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढल्याचे दिसून आले.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी (ता.७) ऑनलाईन पद्धतीने पार पडली. त्यामध्ये ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव वाढत असतानाच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहत नसल्याचा आरोप सदस्यांनी लावला. कोणत्याही प्रकारची पूर्व सुचना न देता अचानक वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित राहत असल्याने ग्रामीण भागात लसीकरण मोहीम प्रभावित होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यामुळेच ग्रामीण भागात कोरोनाला रोखण्यात आरोग्य व्यवस्था कमकुवत ठरत असल्याचे आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी कळसकर हे कोणाचीही परवानगी न घेता कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचा मुद्दा शिवसेनेचे सदस्य गोपाल दातकर यांनी उपस्थित केला. त्यावर आरोग्य विभाग रात्रंदिवस काम करीत असून, सर्वांना आावश्यक त्या सूचना देण्यात आल्याचे डीएचओ आसोले म्हणाले. सभेला अध्यक्षा प्रतिभा भोजने, उपाध्यक्षा सावित्री राठोड, सदस्य प्रशांत अढाऊ, चंद्रशेखर चिंचोळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड व इतरांची उपस्थिती होती.

लसीकरण केंद्रावर मुलभूत सुविधा द्या

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु आहे. लसीकरणासाठी सकाळपासूनच लाभार्थी केंद्रावर गर्दी करत आहेत. परंतु त्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व बैठकीची व्यवस्था नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रावर रुग्ण कल्याण समितीच्या निधीतून मुलभूत सुविधा पुरविण्याची मागणी जि.प. गजानन पुंडकर यांनी केली. सदर व्यवस्था करण्यात येतील, असे डीएचओ आसोले म्हणाले.

कृषीच्या अखर्चित निधीवर नाराजी

स्थायी समितीच्या सभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी कृषी विभागाकडून राबविण्यात आालेल्या योजनांची माहिती मागितली. कृषी विकास अधिकारी मुरली इंगळे यांनी माहिती सादर केली. त्यामध्ये २ कोटी ६२ लाखांपैकी एक कोटी दोन लाखाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला, असे दातकर म्हणाले. १३०० रुपयांसाठी शेतकऱ्यांना प्रचंड त्रास झाला असून, कृषी विभागाचे उंबरठे झिजवावे लागले. ऑनलाईन ७/१२ दिसत असतानाही प्रत मागविण्यात आली. शेतकऱ्यांना वेठिस धरण्याचे काम कृषी विभाग करत आहे, अशा शब्दात विरोधकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

नादुरूस्त हातपंपांचा मुद्दा गाजला

सभेत ग्रामीण भागातील पाणी टंचाईच्या विषयावर सदस्य गजानन पुंडकर यांनी प्रश्न उपस्थित केला. तीव्र पाणीटंचाई असल्यानंतर सुद्धा ग्रामीण भागात हाथपंप नादुरूस्त असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. पाणी टंचाई निवारण्यासाठीच्या उपाय योनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे सदस्य गजनान पुंडकर म्हणाले.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com