esakal | विठ्ठला.. विठ्ठला... मंदिर बंद अन् मदिरा सुरू! आषाढी एकादशीलाही उघडले नाहीत मंदिराचे दार
sakal

बोलून बातमी शोधा

मंदिर बंद अन् मदिरा सुरू! आषाढी एकादशीलाही उघडले नाहीत दार

मंदिर बंद अन् मदिरा सुरू! आषाढी एकादशीलाही उघडले नाहीत दार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिवरखेड (जि. अकोला) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावरसुद्धा हिवरखेड येथील श्री विठ्ठल रुकमाई मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद होते. यामुळे हिवरखेड येथील श्री विठ्ठल भक्तांद्वारे नाराजीचे सूर ऐकायला मिळाले. एकीकडे दारूची दुकाने उघडण्याची परवानगी सरकारने दिली दुसरीकडे पंढरीची वारी न करू शकलेल्या वारकऱ्यांसाठीही मंगळवारी विठ्ठल मंदिराची दारे पावन पर्वावरही बंद असल्याने भाविकांची नाराजी झाली. (Temple-closed-Liquor-Shop-started-Ashadi-Ekadashi-Akola-News-nad86)

दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरीला पोहोचतात. सर्वसामान्य नागरिक जवळपासच्या मंदिरांमध्ये भक्तिभावाने पूजा-अर्चा करून विठुराया चरणी नतमस्तक होतात. कोविड नियमांच्या नावाखाली पंढरीसह संपूर्ण देवालयांवर निर्बंध घातलेले दिसत आहेत. त्यामुळे आता देवदर्शन सुद्धा लपून छपून करावे लागेल काय? असा सवाल भाविक करीत आहेत.

हेही वाचा: ...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा! उसळली बघ्यांची गर्दी

फक्त सहिष्णुता असणाऱ्यांनाच वेठीस का धरले जाते, असा प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे. मंदिरांपेक्षा मदिरालय शासनासाठी महत्त्वाची झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अनेक प्रकारची अवैध कामे राजरोसपणे सुरू असताना धार्मिक कार्यक्रम आणि धार्मिक स्थळांवर निर्बंध कितपत योग्य आहेत यावर शासनाने विचार करणे आवश्यक आहे.

मंदिर बंद मदिरालये सुरू हा प्रकार म्हणजे भावी पिढीला संस्कारी बनविण्याऐवजी व्यसनाधीन बनविण्याचे सुनियोजित षडयंत्र दिसत आहे.
- नंदकिशोर चौबे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष हिवरखेड

हेही वाचा: हवामान तज्ज्ञांनी पावसाबाबत दिले संकेत; चिंता वाढणार की कमी होणार?

गर्दीची इतर ठिकाणे सुरूच असताना भाविकांची श्रद्धास्थाने बंद ठेवून शासनाला काय संदेश द्यायचा आहे नेमके तेच कळत नाही.
- सीमा संतोष राऊत, सरपंच, ग्रामपंचायत हिवरखेड

(Temple-closed-Liquor-Shop-started-Ashadi-Ekadashi-Akola-News-nad86)

loading image