esakal | दहा महसूल मंडळ कोरडेठाक; दोनमध्ये अतिवृष्टी!
sakal

बोलून बातमी शोधा

rain

दहा महसूल मंडळ कोरडेठाक; दोनमध्ये अतिवृष्टी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्ह्यात रविवारी (ता. ११) सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गांधीग्राम येथील पूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागली. त्यासोबतच इतर नदी व नाल्यांना सुद्धा पावसामुळे पूर आल्याचे दिसून आले. रविवारी उशीरा रात्री दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील दोन महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामध्ये पातूर तालुक्यातील आलेगाव येथे ८४ मिमी तर तेल्हारा तालुक्यातील मालेगाव बाजार येथे ७८ मिमी पावसाची नोंद झाली, तर जिल्ह्यात सरासरी २२.४ मिमी पावसाची नोंद झाली. असे असले तरी जिल्ह्यातील दहा महसूल मंडळात मात्र गत २४ तासांमध्ये पाऊसच न झाल्याचे दिसून आले. (Ten revenue boards dry up; Excessive rain in two!)

हेही वाचा: इंग्रजांनी ७० वर्षे अकोल्यात छापल्या चलनी नोटा!

यावर्षी वेळेपूर्वीच राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले होते. जून महिन्याच्या सुरूवातीलाच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केली होती. त्यानंतर राज्याच्या इतर भागांमध्ये मॉन्सून हजेरी लावेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्यानुसार जून महिन्याच्या सुरुवातीला अकोला जिल्ह्यात सुद्धा पावसाने हजेरी लावली. परिणामी जून महिन्याच्या शेवटपर्यंत जिल्ह्यातील अर्ध्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. परंतु त्यानंतर मात्र पाऊस रुतला. त्यामुळे शेतातील पिके संकटात सापडली होती. अनेक ठिकाणी पेरण्या उलटण्याची शक्यता सुद्धा व्यक्त करण्यात येत होती. परंतु वेळेवरच म्हणजेच गत दोन-तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. परंतु सदर पाऊस हा कमी अधिक प्रमाणात होत होता. दरम्यान रविवारी (ता. १२) रात्री मात्र पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे दोन-तीन तालुक्यातील नाल्यांना पूर आले तर नद्यांमध्ये सुद्धा पावसाचे पाणी जमा झाले. वेळेवरच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट सुद्धा टळले.

हेही वाचा: भाषण सुरु असतानाच अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा सौम्य झटका, प्रकृती स्थिरया महसूल मंडळात पाऊस नाही (गत २४ तासांत)
- अकोट - अकोट, आसेगाव, उमरा
- बाळापूर - बाळापूर, पारस
- पातूर - चान्नी, सस्ती
- अकोला - उगवा, आगर
- बार्शीटाकळी - राजंदा

हेही वाचा: अकोला बाजार समितीत लाखोंचा गैरव्यवहार - शेतकरी जागर मंच


दोन गावाचा संपर्क तुटला
अकोट तालुक्यात रविवारी (ता. १२) झालेल्या जोरदार पावसामुळे पठार नदीला पूर आला. त्यामुळे पनोरी-दणोरी या दोन गावांचा संपर्क तुटला. पूरामुळे दोन गावांना जोडणाऱ्या नदीच्या पूलाचा दरवर्षी वाहून जाणारा भाग यावेळीही वाहून गेला. आता हा पूल धोकादायक अवस्थेत असून पुलाचा उर्वरित भाग पुराच्या तडाख्याने कधीही वाहून जाऊ शकतो.
------------------
जिल्ह्यात झालेला पाऊस (मिमीमध्ये)
तालुका २४ तासांत एकूण
अकोट १०.५ ३८.४
तेल्हारा ५३.३ १२५.७
बाळापूर १५.९ ४३.७
पातूर २८.९ ८९.१
अकोला १७.४ ५९.२
बार्शीटाकळी ८.९ ५३.६
मूर्तिजापूर ३०.४ ११३.४
---------------------------------
एकूण २२.४ ७२.१

संपादन - विवेक मेतकर

Ten revenue boards dry up; Excessive rain in two!

loading image