esakal | इंग्रजांनी ७० वर्षे अकोल्यात छापल्या चलनी नोटा!
sakal

बोलून बातमी शोधा

इंग्रजांनी ७० वर्षे अकोल्यात छापल्या चलनी नोटा!

इंग्रजांनी ७० वर्षे अकोल्यात छापल्या चलनी नोटा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः भारतावर इंग्रजांचे राज्य असताना त्या काळात इंग्रजांच्या चलनी नोटांची छपाई अकोला येथे होत होती. अशी अद्भुत व महत्वाची महिती अकोला येथील जागतिक मुद्रा संग्राहक व अभ्यासक अक्षय प्रदीप खाडे यांनी दिली आहे. बहुतांश अकोलेकरांना ही अकोल्यासाठी भूषणावह असलेली बाब आजपर्यंत माहितच नाही. (Currency notes printed by British in Akola for 70 years!)

सन् १८६१ ते १९३० या ७० वर्षांच्या कालावधीत या नोटांची छपाई अकोला येथे होत होती. यात ५, १०, २०, ५०, १००, ५०० व १००० रुपयांच्या नोटांचा समावेश होता. यापैकी केवळ एक हजार रुपयाच्या नोटेची छपाई अकोल्यात होत नव्हती. या नोटांबाबत अधिक माहिती देताना अक्षय खाडे यांनी नमूद केले की, या नोटांची छपाई केवळ एकाच बाजूस केलेली असे. त्यास ‘युनिफेस नोट’ असे म्हणत असत. हाताने तयार केलेल्या एका विशिष्ठ कागदावर या नोटांची छपाई केल्या जात असे. कलकत्ता, अलाहाबाद, लाहोर, बॉम्बे, कराची, नागपूर, मद्रास व रंगून येथे सुद्धा इंग्रजांच्या चलनी नोटांची छपाई होत असे. या नोटांची पार्श्वभूमी हिरव्या व लाल रंगाची असून त्यावर नोट छापल्याची तारीख व छपाईचे ठिकाण नमूद केलेले असायचे. त्या काळात रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली नसल्याने नोटांवर ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया’ असे लिहिलेले असायचे.

हेही वाचा: अबब...२० लाखांचा बोकड,आठवडी बाजारात बघ्यांनी केली गर्दीसन् १९३० पर्यंत करण्यात येत होती छपाई
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतावर इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते. या कंपनीचे वित्तीय संचालक जेम्स विल्सन यांनी १८५९ साली नोटांची छपाई करण्याचा निर्णय घेतला. त्या पूर्वी नोटांऐवजी नाण्यांचा वापर चलनात होत असे. जेम्स विल्सन यांनी स्वतः अकोला येथे येऊन जागेची व शहराची पाहणी करून अकोल्यात नोटा छपाई करण्यास मंजुरी दिली होती. कारण तेव्हा अकोला हे रेल्वे मार्गावरील एक प्रमुख शहर होते. त्यानुसार सन् १८६१ पासून अकोला येथे नोटांची छपाई सुरू झाली, ती १९३० पर्यंत अव्याहतपणे सुरू होती.

हेही वाचा: Success Story; योगेशच्या पेढ्याला राज्यभरासह राज्याबाहेरही मागणी

नोटांवर विविध भाषेतील मजकूर
छपाई करण्यात येत असलेल्या नोटांवर डाव्या व उजव्या बाजूस नोटेचा सीरियल नंबर टाकलेला असून ६ भाषांमधून मजकूर असायचा. अकोल्यात छापल्या जाणाऱ्या नोटांवर उर्दू, गुजराती, मराठी, कन्नड व इंग्रजी या भाषेतील मजकूर असायचा. ५ रुपयांची नोट १० बाय १६ सेंटिमीटर आकाराची तर १० ते १००० रुपयांची नोट १२ बाय १७ सेंटिमीटर आकाराची असायची. १९३५ साली रिझर्व बँकेची स्थापन झाल्यानंतर या नोटांवर ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ असे छापण्यास सुरुवात झाली. तसेच २००५ पासून भारतीय नोटांवर छपाईचे वर्ष नमूद करण्यात येऊ लागले. अशी ही माहिती अक्षय खाडे यांनी दिली.

संपादन - विवेक मेतकर

Currency notes printed by British in Akola for 70 years!

loading image