esakal | अकोला बाजार समितीत लाखोंचा गैरव्यवहार - शेतकरी जागर मंच
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला बाजार समितीत लाखोंचा गैरव्यवहार - शेतकरी जागर मंच

अकोला बाजार समितीत लाखोंचा गैरव्यवहार - शेतकरी जागर मंच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असून, जिल्हा विशेष परीक्षकांच्या लेखा परीक्षण अहवालातही त्यांची नोंद असल्याचा आरोप शेतकरी जागर मंचच्या संयोजकांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत केला. बाजार समितीमधील गैरव्यवहाराची चौकशी करून संचालक मंडळावर कारवाई आणि प्रशासकांची नियुक्ती करावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली. (Millions misappropriated in Akola Bazar Samiti - Shetkari Jagar Manch)

हेही वाचा: Success Story; योगेशच्या पेढ्याला राज्यभरासह राज्याबाहेरही मागणी

जिल्हा विशेष लेखापरीक्षक कैलास सोळंखे यांनी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण केले होते. या लेखापरीक्षण अहवालात संचालक मंडळाने केलेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार, गैरव्यवहार, नियमबाह्य कामे इत्यादी बाबी नमूद असून, बाजार समितीच्या संचालक मंडळाने कर्तव्यात कसूर व पदाचा दूरुपयोग करून लाखोचे नुकसान आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप शेतकरी जागर मंचचे संयोजक कृष्णा अंधारे, मनोज तायडे, जगदिश मुरमकार यांनी केला. त्यामुळे शेतकरी हितासाठी भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी संचालकांवर कारवाई व प्रशासक नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी शेतकरी जागर मंचचे दीपक गावंडे, ज्ञानेश्‍वर गावंंडे, नीलेश ठोकळ उपस्थित होते.

हेही वाचा: मध्यरात्री स्‍मशानभूमित अघोरी पुजा; मांत्रिकांसह युवकावर कारवाई

या गैरव्यवहारांचा आरोप
उपबाजार आवाराच्या सात एक्कर जागेचा दूरुपयोग, शेतमाल तारण कर्ज योजना, वाहन विक्री, सेस वसुली, अंतर्गत लेखापरीक्षण फी, शेतकरी अर्थसहाय्य योजना व सिंचन अनुदान वाटप, उच्च शिक्षण शिष्यवृत्ती अनुदान योजना, वसंत कृषी प्रदर्शन, बेकायदेशीरपणे गाळ्यांचे वाटपामध्ये भ्रष्टाचार, नीळकंठ सहकारी सूतगिरणीला दिलेल्या पाच कोटीच्या भाग भांडवलाचे भाग प्रमाणपत्र नाही, नियमबाह्य पुतळा उभारणीवर ४१ लाखाचा खर्च, नियमबाह्य सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून लाखोचा भ्रष्टाचार, हिशोब व आर्थिक पत्रकांमध्ये तफावती असल्याचे आरोप शेतकरी जागर मंचद्वारे पत्रकार परिषदेत करण्यात आले.

हेही वाचा: अबब...२० लाखांचा बोकड,आठवडी बाजारात बघ्यांनी केली गर्दीकरण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या आरोपांमागे राजकारण दिसून येत आहे. आम्ही याबाबत लवकरच खुलासा करू.
- शिरीष धोत्रे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला

संपादन - विवेक मेतकर
Millions misappropriated in Akola Bazar Samiti - Shetkari Jagar Manch

loading image