मानसेवी कर्मचारी नियुक्तीवरून प्रशासन, पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपणार

मानसेवी कर्मचारी नियुक्तीवरून प्रशासन, पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपणार

अकोला ः महानगरपालिका स्थायी समिती सभेत प्रशासनाने पाठवलेल्या ११५ मानसेवी पैकी दोन जणांना कमी करून तसेच प्रशासनाने वगळलेल्या सहा जणांना समाविष्ट करून मंजूर केलेला प्रस्ताव प्रशासनाने विखंडनासाठी पाठवला आहे. राज्य शासनाच्या निर्णयाच्या अधिन राहून प्रशासनाने ११५ मानसेवींना कामाचे आदेश दिले आहेत. यात स्थायी समितीने कमी केलेल्या दोन अभियंत्यांचा समावेश आहे.

मानसेवी कर्मचारी नियुक्तीवरून प्रशासन, पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपणार
धक्कादायक, सिझर करताना पोटात राहिली बँडेजची पट्टी


महापालिकेत मागील १५ ते २० वर्षापासून विविध पदांवर अधिकारी, अभियंते, संगणक चालक, सुरक्षा रक्षक मानसेवी म्हणून कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्याने कामाचे आदेश दिले जातात. आता पर्यंत ही प्रथा सुरु होती. मात्र आयुक्त निमा अरोरा यांनी मानसेवी म्हणून कार्यरत १२२ कर्मचाऱ्यांपैकी सात कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही नियमानुसार झालेली नसल्याचे कारण स्पष्ट करुन ११५ मानसेवींच्या मुदतवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवला होता. (The administration will decide on the appointment of staff)

मानसेवी कर्मचारी नियुक्तीवरून प्रशासन, पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपणार
आणखी ३७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

स्थायी समितीच्या सभेत या विषयावर चर्चा होवून प्रशासनाने पाठवलेल्या ११५ कर्मचाऱ्यांपैकी दोन अभियंत्यांची नावे कमी करून ११३ तसेच प्रशासनाने कमी केलेल्या ७ कर्मचाऱ्यांच्या नावाचा समावेश करून १२० कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव मंजुर केला. हा मंजुर प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात आला. मात्र प्रशासनाने स्थायी समितीने मंजूर केलेला प्रस्ताव महापालिका अधिनियम ५३ (१)चे उल्लंघन करणारा असल्याचे कारण देत राज्य शासनाकडे विखंडनासाठी पाठवला आहे.

The administration will decide on the appointment of staff

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com