
अस्वलाने मांडले शेतात ठाण; रेस्क्यूसाठी वनविभागाचे पथक दाखल
हिवरखेड : हिवरखेड तळेगाव दरम्यान केळीच्या शेतात एक अत्यंत मोठे अस्वल ठाण मांडून बसल्याने शेतकऱ्यात भीती पसरले असून दिनांक 31 जानेवारी रोजी पहाटे सुधाकर गावंडे, रामदास गावंडे, वैभव गावंडे, अंकेश ताथोड, प्रवीण गावंडे, तुषार गावंडे, विश्वनाथ गावंडे, केशवराव गावंडे, किशोर गावंडे, उद्धव खराबे, गौरव गावंडे इत्यादी शेतकरी शेतात गेले असता सुधाकर गावंडे यांच्या शेतात केळीच्या पिकामध्ये मोठ्या अस्वलाने ठाण मांडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर अस्वलाला पाहून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हेही वाचा: तडीपार आरोपीची पोलिसांना कोयता दाखवून धक्काबुक्की
समयसूचकता बाळगून शेतकऱ्यांनी सदर माहिती तात्काळ पोलीस पाटील प्रकाश गावंडे, सुरज चौबे, धिरज बजाज इत्यादींना दिली. ह्या सर्वांनी तात्काळ वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन रेस्क्यू साठी येण्याची विनंती केली. त्यामुळे वनाधिकारी तायडे आणि त्यांची चमू लवकरच घटनास्थळी पोहोचली आणि वरिष्ठांच्या निर्देशानुसार अस्वलाचा रेस्क्यू साठी जाळे, स्टिक इत्यादी साहित्यासह आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली. तसेच डॉट मारून बेशुद्ध करण्यासाठी अमरावती येथील चमूला पाचारण करण्यात आले होते. वृत्त लिहिस्तोवर अमरावती येथील चमू पिंजरा घेऊन पोहोचण्यात होती. आता अस्वल जेरबंद होते की चकमा देऊन पसार होते ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हिवरखेड आणि आजूबाजूच्या परिसरात मागील काही काळात वाघ, बिबट, तडस, अस्वल, जंगली डुक्कर, इत्यादी हिंस्त्र वन्यपशुसह हरण, नीलगाय, जंगली रेडा, माकडं, आणि ईतर वन्यप्राण्यांनी चांगलाच उधम माजविला असून हिंस्त्र पशू शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांच्या शिकारी करीत आहेत तर इतर प्राणी शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान करीत आहेत.
हेही वाचा: Bhosari : तडीपार आरोपीची पोलिसांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की
हिंस्त्र पशूंच्या वावरामुळे जीवितहानीची शक्यता निर्माण झाली असून मेळघाटच्या सीमेवर जाळीचे कुंपण घालणे अत्यंत आवश्यक झाले असून अकोला अमरावती बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेजवळ आणि मेळघाट पासून हाकेच्या अंतरावर वसलेल्या हिवरखेड येथे वन्य प्राणी रेस्क्यू सेंटर उभारण्याची मागणी हिवरखेड (akola news)येथील जागरूक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
जेणेकरून माहिती मिळताच तात्काळ वन्यप्राण्यांचे रेस्क्यू करून त्यांना जंगलात त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडता येईल. हिवरखेड येथे रेस्क्यू पथकाचे नियोजन आवश्यक असल्याची बाब तत्कालीन आर. एफ. ओ. आणि सध्या ACF असणारे कमलेश पाटील यांनी सुद्धा अधोरेखित केली होती हे विशेष.(forest department)
Web Title: The Bear Stands In The Farm Forest Department Team Filed For Rescue
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..