
तडीपार आरोपीची पोलिसांना कोयता दाखवून धक्काबुक्की
पिंपरी : तडीपार असतानाही हद्दीत आलेल्या आरोपीकडे चौकशी करीत असलेल्या पोलिसांना त्याने धक्काबुक्की केली. तसेच आरोपीने कोयता दाखवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.हा प्रकार पिंपळे सौदागर येथे घडला.
हेही वाचा: ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थ्यांच्या विरोध; पुणे, नागपूरमध्ये आंदोलन
याप्रकरणी शाम रमणलाल साळुंके (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सलीम पापा शेख (वय ३६, रा. अशोका पार्क सोसायटी, पिंपळे सौदागर) याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी हे सांगवी पोलिस ठाण्यात नाईक पदावर कार्यरत आहेत. पिंपरी -चिंचवड पोलिसांनी(pimpri chinchwad) आरोपीला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तरीही तो हद्दीत आला. शनिवारी (ता. ३०) पहाटे तो पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डनजवळ पोलिस पथकाला दिसून आला. दरम्यान, फिर्यादी हे त्याच्याकडे चौकशीसाठी गेले असता आरोपी त्यांना धक्का मारून निघून जाऊ लागला.
पोलिस पथकाने त्याला अटकाव केला असता आरोपीने त्याच्याकडील कोयता पोलिसांना दाखविला. आक्रमक व हिंसक होऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस(police) अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Criminal Has Crime And Fight In Front Of Police In Pimple Soudagar In Pimpri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..