लसींच्या डोसची ७० आणि ३० टक्क्यांमध्ये विभागणी होणार

- ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी कोव्हिशील्डचे १० हजार डोस प्राप्त
लसींच्या डोसची ७० आणि ३० टक्क्यांमध्ये विभागणी
लसींच्या डोसची ७० आणि ३० टक्क्यांमध्ये विभागणीMedia Gallery
Updated on

अकोला ः कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी (Corona preventive vaccination) जिल्ह्याला कोव्हिशील्ड (Covishield) लसींचे १० हजार डोस बुधवारी (ता. १२) मिळाले. त्यामुळे या डोससह जिल्ह्यात साठा असलेल्या डोसमधील ७० टक्के डोस हे दुसऱ्या तर ३० टक्के डोस पहिल्या लसीकरणासाठी वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या डोसची प्रतीक्षा करत असलेल्या लाभार्थ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. Divide the vaccine dose into 70 and 30 percent

जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासोबतच लसीकरणावर सुद्धा करण्यात येत आहे. परिणामी प्रत्येक लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. दरम्यान जिल्ह्यासाठी बुधवारी (ता. १२) कोव्हिशिल्ड लसींचे १० हजार प्राप्त झाले. त्यामुळे ४५ वर्ष वयोगटावरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लसींच्या डोसची ७० आणि ३० टक्क्यांमध्ये विभागणी
पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!

जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसींचे २ हजार ९६० डोस उपलब्ध असून त्याचा वापर फक्त दुसऱ्या लसीकरणासाठी करण्यात येणार आहे. तसेच कोव्हिशिल्डचे २० हजार ३४० डोस उपलब्ध असून ती लस ७० टक्के दुसऱ्या डोससाठी व ३० टक्के पहिल्या डोससाठी देण्यात येईल. कोव्हीशिल्ड ही लस ४२ दिवसानंतरच घेता येईल. त्याआधी सदर लसीसाठी लाभार्थी कोरोना लसीकरण ॲपमध्ये अपॉईंटमेंट घेऊ शकणार नाही, असे आरोग्य विभागामार्फत कळवण्यात आले आहे.

लसींच्या डोसची ७० आणि ३० टक्क्यांमध्ये विभागणी
आरोग्य यंत्रणा हादरली; ‘म्युकर मासोसीस’मुळे महिलेचा झाला मृत्यू

लसीकरण केंद्रावरील गर्दी वाढतीच

सध्या जिल्ह्यातील बहुतांस केंद्रांवर लसीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या ४५ वर्ष वयोगटावरील लाभार्थ्यांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यामुळे गत महिन्याभरापासून लसीच्या प्रतीक्षेत असलेले लाभार्थी लसीकरण केंद्रांवर पोहचत आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी केंद्रावर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

लसींच्या डोसची ७० आणि ३० टक्क्यांमध्ये विभागणी
न्युमोनियाच्या नावाखाली कोरोना रुग्णांवर उपचार

२.३१ लाख लाभार्थ्यांनी घेतली लस

जिल्ह्यासाठी आतापर्यंत २ लाख ५६ हजार ६५० कोरोनाच्या लसींचे डोस प्राप्त झाले आहेत. त्यामधून आतापर्यंत दोन लाख ३१ हजार ४७४ लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. उर्वरीत लाभार्थी लसीचा दुसरा डोस घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

लसींच्या डोसची ७० आणि ३० टक्क्यांमध्ये विभागणी
धोक्याची घंटा, सहा बालकांना कोरोनाची लक्षणे

तरुणांच्या लसीकरणाला तूर्तास ब्रेक

केंद्र शासनाकडून कोव्हिशील्डचे १६ लाख डोस अद्याप मिळायचे आहेत. त्यामुळे लसीकरण मोहिमेत राज्यभर खोळंबा निर्माण होत आहे. परिणामी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी खरेदी करण्यात आलेले कोरोना प्रतिबंधात्मक डोस ४५ वर्षांवरील नागरिकांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा होईल.

संपादन - विवेक मेतकर

Divide the vaccine dose into 70 and 30 percent

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com