esakal | पाऊस थांबला; पूर कायम! तीन गावांचा संपर्क तुटला
sakal

बोलून बातमी शोधा

Akola

पाऊस थांबला; पूर कायम! तीन गावांचा संपर्क तुटला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने गुरुवारी (ता. ९) दिवसभर विश्रांती घेतली. त्यामुळे जनजीवन सुरळीत झाले असले तरी नदी व नाल्यांना पूर असल्याने तेल्हारा तालुक्यातील तीन गावांचा संपर्क तुटलेला आहे. याव्यतिरिक्त पुरामुळे गुरुवारी सकाळी अकोला-अकोट रस्ते मार्ग बंद होता. त्यासोबतच बाळापूर तालुक्यातील शेगाव-निंबा-अकोट मार्गावरील अंदुरा येथील पुलावरून पूर्णा नदीच्या पुराचे पाणी वाहत असल्याने सदर मार्ग वाहतुकीसाठी बंद होता, परंतु दुपारनंतर वाहतूक सुरू झाली.

हेही वाचा: बुलडाणा : चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

जिल्ह्यात गत दोन-तीन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर पकडला. त्यामुळे नदी व नाल्यांना पूर आला असून लहान, मोठ्या पुलावरून पाणी वाहत आहे. असे असले तरी गुरुवारी (ता. ९) मात्र सकाळपासूनच आकाश निरभ्र दिसून आले. त्यामुळे सूर्यदर्शन सुद्धा झाले. परंतु पूराच्या व पावसाच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील नदी व नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे तेल्हारा तालुक्यातील नेर, सांगवी, पिवंदळ या गावांचा संपर्क नाल्याच्या पुरामुळे तुटलेला आहे. त्यासोबतच काही रस्ते मार्गाने वाहतूक सुद्धा बंद झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा: एकाच वर्षात सोयाबीन बियाणे दर्जेदार!

तालुकानिहाय पुरस्थितीबाबत अपडेट

  • अकोला तालुक्यात गत २४ तासांमध्ये १८.४ मिमी पाऊस झाला. तालुक्यातील सर्व नदी, नाल्यांना पूर आहे. ६ सप्टेंबर पासून काटेपूर्णा नदीमध्ये वाहून गेलेलप्या दोन युवकांपैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. सकाळी गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे अकोला- अकोट रस्ते मार्ग बंद होता. अकोला-म्हैसांग-दर्यापूर रस्ते मार्ग सुरू झालेला आहे.

  • बार्शी टाकळी तालुक्यात ११.१ मिमी पाऊस झाला. तालुक्यातील सर्व नदी, नाल्यांना पूर आहे. कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. या तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातून ५१.१६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे काटेपूर्णा नदीला पूर आहे.

  • अकोट तालुक्यात १८.५ मिमी पाऊस झाला. तालुक्यातील सर्व नद्या, नाल्यांना पूर आहे. कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही.

  • तेल्हारा तालुक्यात १८.५ मिमी पाऊस झाला. तालुक्यातील सर्व नदी-नाल्यांना पूर आहे. नेर, सांगवी, पिवंदळ या गावांचा नाल्याचा पुरामुळे संपर्त तुटलेला आहे. सदर संपर्क सद्यस्थितीत पुराचे पाणी कमी झाल्यामुळे पूर्वपदावर येत आहे. वान प्रकल्पातूनस ४६.२४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

  • बाळापूर तालुक्यात १८.५ मिमी पाऊस झाला. सर्व नदी-नाल्यांना पूर आहे. तालुक्यातील शेगाव-निंबा-अकोट मार्गावरील अंदुरा येथील पुलावरून पूर्णा नदीच्या पुराचे पाणी वाहत होते. सद्यस्थितीत रस्ते मार्ग सुरू झाला आहे. हाता येथील काही घरांमध्ये पाणी गेले आहे.

  • पातूर तालुक्यात ६.७ मिमी पाऊस झाला. तालुक्यातील सर्व नदी-नाल्यांना पूर आहे. कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही.

  • मूर्तिजापूर तालुक्यात ३२.९ मिमी पाऊस झाला, तर कुरूम महसूल मंडळात ६९.८ मिमी पाऊस झाला. मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा येथील नंदकिशोर टापरे वय २८ वर्ष उमा नदीवरील पुलावरून पाय घसरून नदीत वाहून गेले आहेत. त्याचे शोध कार्य एसडीआरएफच्या पथकाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा: गृहकलहातून मुलीने, चुलत भावाच्या मदतीने केला बापाचा खुन

मंगळवारपर्यंत पावसाचा इशारा

हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार मंगळवार (ता. १४ सप्टेंबर) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचे पर्जन्यमान व एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

loading image
go to top