esakal | कापूस पिकासाठी जगातील पहिला इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर रोबोट भारतात

बोलून बातमी शोधा

agricultural robot for cotton

कापूस पिकासाठी जगातील पहिला इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर रोबोट भारतात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जगातील पहिला इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर रोबोट भारतात बनविला जाणार असून, त्याबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व ज्योश आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सोल्युशन्स ठाणे यांच्यात सामंजस्य करार नुकताच संपन्न झाला. कापूस पिकासाठी व देशातील कापूस उत्पादकांसाठी हा ‘यंत्रमानव’ निश्‍चितच एक वरदान ठरणार असून, त्याचा देशाला मोठा फायदा होऊ शकतो.

देशांतर्गत कापूस लागवडीचे क्षेत्र १२९ लाख हेक्टर असून, सुमारे ६० लाख शेतकरी कापसाची लागवड करतात तथा विदर्भ मराठवाड्यासाठी कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. विदर्भात बहुतांश शेतकरी अनेकानेक वर्षांपासून कापूस पिकाची लागवड करतात.

हेही वाचा: सोयाबीनला विक्रमी भाव; तूर, हरभराही जोरदार

परंतु, गत काही काळापासून कापूस उत्पादक शतेकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत असून, त्यामध्ये कापूस वेचणी सह कीड-रोगांचे नियंत्रण, तणांचे-खतांचे नियोजनाबाबत अडचणी भासतात. मात्र, समाधानाची बाब म्हणजे कापूस पिकामध्ये यांत्रिकीकरणाचा प्रभावी वापर होण्यासाठी विविध केंद्रीय संस्था, कृषी विद्यापीठे, खाजगी संस्था आदी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असून, त्याचाच एक भाग म्हणजे लवकरच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व ज्योश आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सोल्युशन्स ठाणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून जगातील पहिला इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर रोबोट तयार केला जाणार आहे.

हेही वाचा: भाव घसरल्याने कांदा फेकला जातो रस्त्यावर

या यंत्रमानवाच्या सहायाने कापूस वेचणी सह पिकातील कीड-रोगांचे नियंत्रण, तणांचे-खतांचे नियोजन करता येणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांसाठी ‘तो’ एक वरदानच ठरणार असल्याचे, रोबोट निर्मिती सामंजस्य करार करतेवेळी (७ एप्रिल २०२१) अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी सांगितले.

हेही वाचा: बोगस बियाणे-खत विक्रीवर भरारी पथकांचा वॉच

कृषी यंत्रमानव लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध होणार

ठाण्याच्या ज्योश आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सोल्युशन्स या कंपनीने गेले सहा महिन्यापासून इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर रोबोट (कृषी यंत्रमानव) बनवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर आधारित तंत्रज्ञान वापरून हा कृषी यंत्रमानव लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे यांनी सांगितले.

हेही वाचा: यंदा असा असेल पावसाळा, करा पिकांचे नियोजन

यंत्र मानवाची निर्मिती प्रगतीपथावर

रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करीत कापूस पिकांमधील तणांचे नियंत्रण तथा कापूस वेचणी संदर्भात हा करार आहे. ज्योश आर्टिफिशिअल इंटेलिजन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारा कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेत यंत्र मानवाची निर्मिती प्रगतीपथावर असून, या उपक्रमात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सहयोगाने विविध तांत्रिक बाजू बळकट करण्यात येत आहेत. कापूस उत्पादकांसाठी वरदान ठरणारा यंत्रमानव येत्या काळात उपलब्ध होणार असून, जगातील पहिला इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर रोबोट हा भारतात बनणार असल्याचे ज्योश कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरदचंद्र लोहोकरे यांनी सांगितले.

संपादन - विवेक मेतकर