
Banjara Protest
sakal
अकोला : बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण द्या, या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने साेमवारी (ता. ६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले. बंजारा समाजातील महिला, पुरुषांचा पारंपारिक वेशभूषेत मोर्चात सहभागी झाले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.