पंधरा दिवसापासून पावसाची दडी; हजारो हेक्टर सोयाबीन ‘डेंजर झोन’मध्ये

पंधरा दिवसापासून पावसाची दडी; हजारो हेक्टर सोयाबीन ‘डेंजर झोन’मध्ये

वाशीम ः यंदा लवकर आलेला पावसाळा प्रारंभी शेतकऱ्यांना आनंद देवून गेला असला, तरी आता कोवळ्या अंकुरांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. काही भागात पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली आहे, तर अनेक ठिकाणी तणनाशकाने पीक जळून गेल्याच्या घटना शेतकऱ्यांना हवालदिल करीत आहेत. (Thousands of hectares of soybeans in the 'danger zone')


यंदा जिल्ह्यात मृग नक्षत्रातच पावसाने दमदार हजेरी लावली होती. परिणामी शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या मालेगाव व मानोरा तालुक्यात पेरणीनंतर पाऊस झाल्याने त्या तालुक्यातील पिके वर आली, मात्र वाशीम, कारंजा, मंगरुळपीर व रिसोड तालुक्यात गत पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने या तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पेरण्या उलटल्या. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ओल होती ते सोयाबीन उगवले, मात्र उगवल्यानंतर पावसाने दडी मारल्याने हे कोवळे अंकूर आता करपून जात आहेत. चार दिवसात पाऊस पडला नाही, तर हजारो हेक्टर सोयाबीन करपून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पंधरा दिवसापासून पावसाची दडी; हजारो हेक्टर सोयाबीन ‘डेंजर झोन’मध्ये
सहा महिन्यात ६० हजार वाहनचालकांनी मोडले नियम

जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी ७० ते १०० मिलीमीटर पाऊस झाला, परिणामी ओढे नद्या व जलस्त्रोत कोरडे आहेत. विहिरींनाही पाणी नाही, अशा स्थितीत संरक्षीत ओलिताचा पर्यायही नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या सोयाबीन पंधरा ते वीस दिवसाचे झाले आहे. पांढऱ्या मुळ्या फूटण्याची ही संवेदनशिल अवस्था आहे. या अवस्थेत पुरेसा ओलावा नसेल, तर उत्पन्नातही घट होण्याची भीती आहे.

पंधरा दिवसापासून पावसाची दडी; हजारो हेक्टर सोयाबीन ‘डेंजर झोन’मध्ये
माजी मंत्री मखराम पवार यांच्या पत्नीचे अतिक्रमण

तणनाशकांची आली आपत्ती
शेतात तण होवू नये यासाठी शेतकरी तणनाशक वापरतात, परंतु यंदा काही ठराविक कंपनीच्या तणनाशकाने पिकेच करपल्याच्या घटना घडत आहेत. जमिनीत पुरेसा ओलावा वापराचे गणीत बिघडले, तर पीक करपते मात्र मोठ्या प्रमाणात होणाऱ्या घटनांची दखल कृषी विभागाने घेणे आवश्यक आहे. जर यामध्ये तणनाशकाचा दोष असेल, तर संबंधित कंपनी विरोधात कारवाई अपेक्षित आहे.

पंधरा दिवसापासून पावसाची दडी; हजारो हेक्टर सोयाबीन ‘डेंजर झोन’मध्ये
अकोला जिल्ह्यातील १२.४५ लाख लाभार्थ्यांना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य!

सध्या जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कोवळ्या पिकांना फटका बसत आहे. हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, मात्र जर पाऊसाअभावी होणारे नुकसान धोक्याची पातळी ओलांडत असेल, तर सोय असल्यास तुषार संघाने एखादे संरक्षीत ओलीत द्यायला हरकत नाही. संरक्षीत ओलीताची सोय नसेल, तर जास्तच गरज पडली तर १०.००.५२ हे उर्वरक फवारणीतून देणे आवश्यक आहे. प्रति दहा लीटर पाण्यात ५० ग्रॅम उर्वरक टाकून फवारणी केली, तर पीक अवर्षणात तग धरून ठेवते. तणनाशकाच्या बाबतीत शेतकऱ्यांनी शास्त्रशुध्द माहिती घेवून फवारणी करणे आवश्यक आहे.
-शंकर तोटावार, जिल्हा कृषी अधीक्षक-अधिकारी, वाशीम.

संपादन - विवेक मेतकर

Thousands of hectares of soybeans in the 'danger zone'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com