Loksabha Election Voting : अकोला शहरातील बिर्ला कॉलनी भागात तीनशे मतदारांचा मतदानावर बहिष्कार ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढली समजूत

अकोला शहरातील बिर्ला कॉलनी भागात राहणाऱ्या 70 कुटुंबातील 300 मतदारांनी अकोला लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे या कुटुंबीयांची जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी समजूत काढली मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही अशी भूमिका संबंधितांनी घेतली आहे.
Loksabha Election Voting
Loksabha Election Voting sakal

अकोला : अकोला शहरातील बिर्ला कॉलनी भागात राहणाऱ्या 70 कुटुंबातील 300 मतदारांनी अकोला लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे या कुटुंबीयांची जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी समजूत काढली मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही अशी भूमिका संबंधितांनी घेतली आहे.

दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला सकाळपासून उत्साहात सुरूवात झाली, पण आता अकोल्यात 70 कुटुंबियांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय. अकोला शहरातील बिर्ला कॉलनीतील 70 कामगार कुटुंबीयांनी अकोला लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकलाय. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दीड महिन्यांपूर्वी बिर्ला कॉलनीतील कामगार कुटुंबीयांसह उपोषणाला बसले होते.

Loksabha Election Voting
Loksabha Election : मुख्यमंत्री शिंदे आक्रमक, महायुतीत पेच ;भाजप आणि शिवसेनेतील चार जागांचा तिढा कायम

या कामगारांच्या 70 कुटुंबांना प्रशासनाने घरे खाली करण्याची नोटीस दिल्यावरून त्यांनी उपोषण पुकारले होते. मात्र अद्यापही तोड़गा नाही निघाली, अखेर या 70 कामगार कुटुंबीयांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्र घेतला. तब्बल 250 हुन अधिक मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे असे कृष्णा तायडे यांनी सांगितले.

काय आहे प्रकार

  • अकोल्यातल्या बिर्ला कॉलनीत ७० कामगारांचे कुटुंबीय वास्तव्यास. 

  • मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रकरण सुरू. 

  • सुनावणी सुरू असताना ७० कुटुंबांना घरे खाली बजावली नोटीस. 

  • घरे खाली केल्यास सर्व ७० कामगार कुटुंबीय येणार अडचणीत.

  • अखेर कामगारांनी साखळी उपोषण केले होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com