तृतीयपंथीयांनी पोलीस स्‍टेशनमध्ये घातला गदारोळ, पोलीसांनी घेतला काढता पाय

मलकापूर येथील घटना ः
तृतीयपंथीयांनी पोलीस स्‍टेशनमध्ये घातला गदारोळ, पोलीसांनी घेतला काढता पाय
तृतीयपंथीयांनी पोलीस स्‍टेशनमध्ये घातला गदारोळ, पोलीसांनी घेतला काढता पायमलकापूर

मलकापूर (जि.बुलडाणा) ः मलकापुरातल्या (Malkapur) एका तृतीयपंथ्यांच्या घरात झालेल्या चोरी प्रकरणात पोलिसांनी कारवाई न केल्याचा ठपका ठेवत काल मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये विर्भातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या तृतीयपंथीयांनी गदारोळ केला. अचानकपणे पोलीस स्टेशनमध्ये सुरु झालेल्या आकांत तांडवामुळे एकच खळबळ उडाली होती. तर तृतीयपंथीयांनी आपले कपडे काढण्याचे प्रयत्न करताच पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. Transgender riots at Malkapur police station

जिल्ह्यातील मलकापूर येथील पंत नगरमध्ये राहत असलेली मोगराबाई (किन्नर) यांच्याकडे ७ मे रोजी रात्री २ वाजेच्या दरम्यान काही लोकांनी घरात घुसून घरातील लोकांना धाक दाखवून,मारहाण करीत रोख रक्कम ५० हजार रुपये, बँक पासबुक , आधारकार्ड आणि दागिने असा पाच लाखापर्यंत ऐवज लुटून नेल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती.

तृतीयपंथीयांनी पोलीस स्‍टेशनमध्ये घातला गदारोळ, पोलीसांनी घेतला काढता पाय
पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!

यात काही संशयितांची नावे सांगितल्या नंतरही पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप करीत फिर्यादी मोगराबाई यांनी ही बाब विदर्भातील अनेक तृतीयपंथीयांच्या कानावर टाकली. त्यामुळे काल मंगळवारी नागपुर, अमरावती, अकोला, चंद्रपूर जळगाव खांदेश आदी जिल्ह्यातील अनेक किन्नरांनी मलकापूर गाठीत थेट शहर पोलिस स्टेशनमध्ये धडक दिली व मोगराबाईच्या तक्रारीनुसार तपास करण्याची मागणी रेटून धरली. मात्र त्यांनी यावेळी पोलिस स्टेशनमध्ये चांगलाच गदारोळ घातला.

थेट पोलिस स्टेशनमध्ये जावून नाचत व आरडाओरड करू लागले. काही तृतीयपंथीयांनी तर आपले कपडे काढण्याचे प्रयत्न करताच पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.

तृतीयपंथीयांनी पोलीस स्‍टेशनमध्ये घातला गदारोळ, पोलीसांनी घेतला काढता पाय
१०३ वर्षांपासून शकुंतला रेल्वेचा लोहमार्ग इंग्रजांकडेच; कधी तुटणार गुलामीच्या बेड्या?

एक तास चाललेल्या या प्रकारात पोलिसांनी सर्वांची समजूत काढल्यानंतर आणि प्रकरण आपसात झाल्यावर हे प्रकरण शांत झाल्याचे समजते. मात्र तृतीयपंथीयांकडून पोलिस स्टेशनमध्ये घातलेल्या गदारोळामुळे पोलिसांना मात्र चांगलाच घाम फुटला होता.

संपादन - विवेक मेतकर

Transgender riots at Malkapur police station

तृतीयपंथीयांनी पोलीस स्‍टेशनमध्ये घातला गदारोळ, पोलीसांनी घेतला काढता पाय
Video: थरारक; आई-मुलाची आत्महत्या, वडिलांनीही पोलिस ठाण्यात घेतले विष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com