
Tribal Community Protest and Demands
esakal
रिसोड : राज्यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेशीर आरक्षण दिले असून, सद्यस्थितीत धनगर, बंजारा, वंजारी अशा अनेक जाती समुदायातील लोक हे आदिवासींसाठी असलेल्या आरक्षणात समाविष्ट करून घेण्यासाठी शासनाकडे दबाव टाकत आहेत. याला तीव्र विरोध करत आदिवासी क्रांतिकारी संघटनेच्या वतीने ता.२९ सप्टेंबर रोजी तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.