Akola : रात्रीच्या 'संचारबंदी'त दोन दिवस वाढ; दिवसाची 'जमावबंदी' उठवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola : रात्रीच्या 'संचारबंदी'त दोन दिवस वाढ; दिवसाची 'जमावबंदी' उठवली

Akola : रात्रीच्या 'संचारबंदी'त दोन दिवस वाढ; दिवसाची 'जमावबंदी' उठवली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : अमरावतीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात १७ नोव्हेंबरपासून शुक्रवार १९ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली होती. त्यात दोन दिवसांची वाढ करण्यात आली असून, आता रविवार, ता. २१ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत रात्रीची संचारबंदी कायम राहणार आहे. दिवसाची जमावबंदीचा आदेश मात्र मागे घेण्यात आला आहे. या काळात अकोल्यात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

हेही वाचा: "एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची स्कॉटलँड वारी"

परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी एसआरपीएफच्या चार तुकड्या, आरसीबीच्या तीन प्लॅटून तर वाशीम आणि यवतमाळहून प्रत्येकी १०० पोलिसांसह अकोला शहरात ३०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरात किंवा अकोला तालुका, जिल्ह्यात अप्रिय घटना घडल्यास संचारबंदी वाढवण्यात येईल. यासोबतच इंटरनेट आणि मोबाईल सेवा देखील बंद करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

पोलिस प्रशासनाने जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. दोन दिवसाच्या संचारबंदी काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशीनुसार अकोला शहरातील संचारबंदी वाढविण्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी नीलेश अपार यांनी गुरुवारी काढला. या आदेशानुसार ता.१९ ते २१ नोव्हेंबर या काळात रात्री ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. संचारबंदी कालावधीमध्ये आरोग्य विषयक सेवा सुरू राहतील.

हेही वाचा: कंगनाच्या 'भीक' या विधानावर जावेद अख्तर उखडले, म्हणाले...

याबाबींचे पालन करा!

  • कोणत्याही धार्मिक भावना दुखावतील किंवा विभिन्न जाती धर्माच्या दोन गटामध्ये तेढ निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य, वक्तव्य करू नये.

  • जातील भावना भडकवणारे आक्षेपार्ह संदेश समाज माध्यमांद्वारे प्रसारीत करणार नाहीत.

  • आक्षेपार्ह पोस्ट टाकणार नाही व समाज माध्यमांचा गैर वापर करणार नाहीत.

  • कोणत्याही प्रकारचे रॅली, धरणे, मोर्चाचेकिंवा कार्यक्रमाचे आयोजन करू नये.

  • निवडणूक प्रचार संदर्भात काही कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी यांची वेगळ्याने परवानगी घेणे बंधनकारक राहील.

  • कोविड लसीकरणाचे सत्र पूर्ण क्षमतेने पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

loading image
go to top