अकोला : घौडदौड रोडवरील अनधिकृत बांधकाम पाडले

मनपाची गोरक्षण रोडवर कारवाई; जागेच्या वादाची किनार
Unauthorized construction on Ghoddaud Road was demolished
Unauthorized construction on Ghoddaud Road was demolishedsakal

अकोला : गौरक्षण रोड परिसरातील घौडदौड रोडवरील डॉ. दिनकर माहोरे यांचे अनधिकृत बांधकाम गुरुवार, ता. ३ फेब्रुवारी रोजी पाडण्यात आले. महानगरपालिक आयुक्त कविता द्विवेदी यांच्या आदेशान्‍वये सहा.आयुक्‍त जगदीश देशमुख यांच्‍या मार्गदर्शनात ही करावाई करण्यात आली. या कारवाईला जागेच्या वादाची किणार आहे. परस्पर तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

घौडदौड रोड नावाने प्रसिद्ध असलेल्या परिसरात डॉ.दिनकर माहोरे यांचे निवास स्थान आहे. त्यांनी मंजूर नकाशा व्‍यतिरिक्‍त अनधिकृत बांधकाम केले होते. ज्‍यामध्‍ये मंजूर नकाशा प्रमाणे तळमजला १२८.६० चौरस मीटर असून, प्रत्‍यक्षात केलेले बांधकाम २००.०५ चौरस मीटर आढळून आले. येथे अनधिकृत बांधकाम ७१.४६ चौरस मीटर केलेले असल्याचे आढळून आले. पहिला मजला मंजूर नकाशा प्रमाणे १२१.९० चौ.मीटर असून, प्रत्‍यक्षात केलेले बांधकाम १४३.६१ चौ.मीटर आहे. अनधिकृत बांधकाम २१.७१ चौ.मीटर आढळून आले. एकूण ९३.१६ चौ.मीटर अनधिकृत बांधकाम केलेले आढळून आले.

मंजूर नकाशा प्रमाणे पूर्व बाजुतील समास अंतर ४.५० ऐवजी १.५ रनिंग मीटर, पश्चिम बाजुतील समास अंतर ४.५० ऐवजी एक रनिंग मीटर आणि उत्‍तर बाजुतील समास अंतर ३.०२ ऐवजी दोन रनिंग मीटर सोडलेले आढळून आल्‍यामुळे त्‍यांच्‍या अनधिकृत बांधकामावर मनपा प्रशासनाव्‍दारे निष्‍कासनाची कारवाई करण्‍यात आली. या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी देविदास निकाळजे, विजय पारतवार, अतिक्रमण सहा. प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, रुपेश इंगळे, रफीक अहमद, वैभव कवाळे, कुणाल शाहू आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

तीन दिवसांपूर्वी कारवाई न करता परतले होते पथक

डॉ. दिनकर माहोरे यांच्या बांधकामाबाबत मनपाला प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेचे पथक तीन दिवसांपूर्वी गेले होते. मात्र, डॉ. माहोरे यांनी स्वतः अनधिकृत बांधकाम पाडणार असल्याने दोन दिवसांचा अवधी मागून घेतला होता. मात्र, दोन दिवसांत बांधकाम पाडले नाही. त्यामुळे गुरुवारी मनपा पथकाने कारवाई केली.

जागेच्या वादातून कारवाई

डॉ. दिनकर माहोरे आणि त्यांच्या बाजूला असलेली माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी राजीव बियाणी यांच्याकडून विकत घेतलेली जागा याबात वाद सुरू आहे. डॉ. माहोरे हे न्यायालयात गेले होते. त्यामुळे न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश खदान पोलिसांना दिले आहे. त्यापूर्वी माजी आमदार बाजोरिया यांनी डॉ. माहोरे यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत महानगरपालिकेकडे तक्रार केली होती. परस्पर तक्रारीतून मनपातर्फे कारवाई करण्यात आल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com