विधान परिषद निवडणुकीसाठी वसंत खंडेलवाल भाजपचे उमेदवार ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola

विधान परिषद निवडणुकीसाठी वसंत खंडेलवाल भाजपचे उमेदवार ?

अकोला : विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात भाजपने अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी दिल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत भाजप प्रदेशकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशीम प्राधिकारी मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध भाजपचा उमेदवार निश्चित करण्यासाठी मुंबईत तिन्ही जिह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना आव्हान देवू शकणारा त्यांच्या तोडीचा उमेदवार देण्यासाठी चर्चा झाल्यानंतर वसंत खंडेलवाल यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा: परीक्षा रद्द झाल्यानंतर शुभेच्छा देणारी जाहिरात

मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. खंडेलवाल यांनी २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळीही जय्यत तयारी केली होती. त्यामुळे त्यांना या निवडणुकीसंदर्भात चांगलाच अनुभव असल्याने भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्याबाबत सहमदी झाल्याची माहिती आहे. खंडेलवाल यांचा सोने-चांदी आभूषण विक्रीचा व्यवसाय असून, शिक्षणक्षेत्रातही त्यांनी चांगले काम केले आहे. अकोल्यातील शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संचालक आहे. या संस्थेतर्फे अकोल्यात अनेक शैक्षणिक संस्था चालविल्या जातात.

loading image
go to top