Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

‘मी बिजेपी चा कार्यकर्ता बोलत आहो. अनुपजी तुम्ही बिजेपी चे जे पैसे वाटपासाठी दिले होते. ते कार्यकत्यापर्यंत पोहोचले नाही’
video goes viral on social media of bjp spending money violence of code of conduct
video goes viral on social media of bjp spending money violence of code of conductSakal

अकोला : ‘मी बिजेपी चा कार्यकर्ता बोलत आहो. अनुपजी तुम्ही बिजेपी चे जे पैसे वाटपासाठी दिले होते. ते कार्यकत्यापर्यंत पोहोचले नाही’ .. अशा आशयाचा उल्लेख असलेला व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याप्रकरणी भाजपा शहराध्यक्ष प्रविण घाईट यांच्या तक्रारीवरुन व्हीडिओ व्हायरल करणाऱ्या युवकाविरुद्ध पोलिसांनी आचारसंहिता भंग करण्यासह विविध गुन्हे दाखल केले आहेत. बार्शिटाकळी येथील साहिल अग्रवाल नामक व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला.

त्या व्हीडिओमध्ये बार्शिटाकळी येथील पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून पैसे घेत दुसऱ्या एका पक्षाचे काम केल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पक्षासाठी आलेला निधी कार्यकर्त्यांना वाटप केला नसल्याचा दावा केला होता.

या व्हीडिओने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. व्हीडिओमध्ये एक इसम स्वतःचे नाव साहील अग्रवाल रा. बार्शिटाकळी असे सांगत असून ‘मी बिजेपीचा कार्यकर्ता बोलत आहो. अनुपजी तुम्ही बिजेपीचे जे पैसे वाटपासाठी दिले होते. ते कार्यकत्यापर्यंत पोहोचले नाही. ते बिजेपीचे जेष्ठ कुचीन नेत्यांनी हे पैसे खाल्ले असल्याचा आरोप केला आहे.

भाजपाने खरचं पैसे वाटप केले का?

भाजपाने खरोखरच पैसे वाटप केले तर नाही ना? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. व्हीडिओमध्ये सदर व्यक्तीने कुणाचे नाव घेतले नसले तरी त्याने मांडलेली वस्तूस्थिती निश्चितच विचार करायला लावणारी आहे अशीही टिका राजकीय वर्तुळात होत आहे.

बार्शिटाकळीत पंजा चालला ..

‘मी तुम्हाला सांगतो, तुम्ही या इलेक्षनमध्ये पडणार आहात. कारण इथे पुर्ण पंजा चालविला आणी बिजेपीचे जे लोक आहेत ‘कुचिन’ .. आहेत. यांनी पैसे खाल्ले आहेत, असे व्हीडिओ क्लिपमध्ये व्यक्ती बोलताना दिसत आहे. व्हीडिओमध्ये स्वतःचे नाव साहिल अग्रवाल सांगत असलेला व्यक्ती हा सुनिल दयाराम भगत रा. तेली पुरा, बार्शिटाकळी येथील रहिवासी आहे.

भाजपा शहराध्यक्षाची तक्रार

लोकसभा निवडणुकीमुळे आचार संहिता लागू असून भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. भाजपाविरुद्ध आक्षेपार्ह व्हीडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करून आचार संहितेचा भंग करण्यासोबत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना शिविगाळ करून पक्षाची व पदाधिकाऱ्यांची जाहिर बदनामी केल्यामुळे आमची व पक्षाची बदनामी झाली आहे, अशी तक्रार भाजप शहर अध्यक्ष प्रविण घाईट यांनी बार्शिटाकळी पोलिसात दिली आहे. यावरून सुनिल दयाराम भगत उर्फ साहिल अग्रवाल याच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग करण्यासोबत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बदनामीकारक व्हीडिओ व्हायरल करण्यासोबत शिविगाळ व अन्य प्रकाराबाबत भाजप शहराध्यक्ष प्रविण घाईट यांनी तक्रार दिली आहे. स्वतःचे खोटे नाव सांगून या युवकाने व्हिडीओ तयार करीत भाजपची बदनामी केली. अशा तक्रारीवरून बार्शिटाकळी पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. -

- शिरिष खंडारे, ठाणेदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com