esakal | मोफत पाठ्यपुस्तकांना सप्टेंबरपर्यंतची प्रतिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत पाठ्यपुस्तकांना सप्टेंबरपर्यंतची प्रतिक्षा

मोफत पाठ्यपुस्तकांना सप्टेंबरपर्यंतची प्रतिक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा (जि.अकोला) ः कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे सन २०२०-२१ चे सत्र अध्ययन, अध्यापन विना गेले. दुसऱ्या लाटेमुळे सन २०२१-२१ हे शैक्षणिक सत्र विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत मिळणाऱ्या पाठ्युस्तकांची छपाई झाली नाही. परिणामी सप्टेबरपर्यंत पाठ्यपुस्तके मिळण्याची शक्यता आहे. म्हणून गतवर्षीचे जुने पुस्तके जमा करून वाटप करावे लागणार आहे. (Wait until September for free textbooks)

हेही वाचा: शिवसेना संतप्त, मनपाच्या सभागृहात पोहचवली घंटागाडी


महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने पुस्तक निर्मिती मंडळ व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके देतात.ते शाळेच्या पहिल्या दिवशी वाटण्यात येतात.गत वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे वर्षभर शाळेत जाता आले नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी पुस्तके नेऊन दिली. वर्षभर व्हॉट्सॲप व ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. यावर्षी दुसरी लाट सुरू असल्याने शाळा सुरू होतील की नाही हे सांगता येत नाही. कोरोनाचा संसर्ग मार्चपासून वाढला होता. त्यामुळे मोफत देण्यात येणाऱ्या पुस्तकांची छपाई अपूर्ण आहे. सप्टेंबर महिन्यात पुस्तके मिळण्याची शक्यता आहे. म्हणून गत वर्षी दिलेली पुस्तके विद्यार्थ्यांकडून परत घेऊन त्यांचा पुनर्वापर करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत.

हेही वाचा: दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रीज कोर्स


दर वर्षी मे महिन्यात मोफत देण्यात येणारे पाठ्यपुस्तके मिळत असतं त्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी वाटप करण्यात येत असे. यावर्षी अद्याप पुस्तके मिळाली नाहीत. ता. २८ जूनपासून प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन शिकवणे सुरू करायचे आहे. म्हणून गत वर्षीचे पुस्तके जमा करून त्यांचा पुनर्वापर करणार आहे.
- मुकेश मुंढे, मुख्याध्यापक नूतन विद्यालय, बेलखेड ता.तेल्हारा जि.अकोला.

संपादन - विवेक मेतकर

Wait until September for free textbooks

loading image