esakal | फलाटावरील पार्किंगला कोणाचा आशीर्वाद?
sakal

बोलून बातमी शोधा

akola

फलाटावरील पार्किंगला कोणाचा आशीर्वाद?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला: शहरातील रस्त्यावर पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर असणाऱ्या दुचाकी वाहनांवर टोईंग पथकाव्दारे जप्तीची कारवाई करून दंड ठोठावल्या जाते. त्यामुळे दुचाकी वाहनचालक नेहमी आपले वाहन व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, शहरातील बस स्थानक दोनवर नेहमीच पार्कींगचा बोजवरा झाल्याचे पाहवयास मिळते. आगारातील कर्माचारी किंवा इतर व्यक्तींकडून नेहमीच फलाटावर वाहने उभी करण्याचा प्रकार केल्या जात आहे. याकडे आगारातील वरिष्ठ अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील बस स्थानक क्र. २ मधील पोलिस चौकीपासूनच पार्कींगचे तीन-तेरा वाजल्याचे पाहवयास मिळते ते थेट फटालापर्यंत जाऊन थांबते. आगारातील कर्मचारी किंवा बाहेरून येणाऱ्या व्यक्तींकडून बिनधास्त खलासावर दुचाकी उभी केल्या जात आहे. त्याच ठिकाणी लांब पल्ल्याच्या बसेस लागतात. एकादी बस बाहेरून आली की, बसमधील प्रवासी उतरताना बाजूलाच असलेल्या दुचाकी वाहनांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: अकोट हादरले! लसीकरण पथकाचा बनाव करून भरदिवसा व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा

एखाद्या वेळी बस चालकाने जेथे बस उभी केल्या जाते त्याच्या शेवटच्या टोकाजवळ बसचे चाक नेल्यास नक्कीच फलाटावर उभ्या असलेल्या दुचाकीला धडक बसणार. त्यामुळे बस चालकाला नियोजित केलेल्या पण, अर्ध्यातच बस थांबवावी लागते. फलाटावर जवळपास नेहमी आठ ते दहा दुचाक्या उभ्याच असतात.

प्रवाशांनाही तेथे उभी राहण्याची जागा नसते. अनेकदा वृद्ध प्रवाशांना या अडचणींचा सामना करावा लागतो. वाहनलाचकांच्या मनमानी कारभाराला कोणी तरी आळा घालावा अशी, मागणी प्रवाशांमधून केल्या जात आहे. आगारातील वरिष्ठ अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: मिरचीला मातीमोल भाव, तोडणीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत

बस स्थानकावरील पार्किंग सुविधाही बंद

गत अनेक महिन्यांपासून बस स्थानकावरील पार्कींग सुविधाही बंद असल्याने दुचाकी ठेऊन बाहेर गावी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पार्कींग सुविधा चालू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच

पार्कींगविषयी अनेक वेळा वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित करण्यात आले तरी, देखील आगारातील वरिष्ठ अधिकारी संबंधित व्यक्तींवर काहीच कारवाई करत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांची हिम्मत वाढली असून, पोलिस चौकीपासून ते फलाटापर्यंत बिनधास्त दुचाकी उभी केल्या जात असल्याचे पाहवयास मिळत आहे.

loading image
go to top