अकोला : ओला दुष्काळ जाहीर करा, विमा व सवलती द्या

तीव्र आंदोलनाचा शेतकरी बचाओ आंदोलनाचा इशारा
ओला दुष्काळ जाहीर करा, विमा व सवलती द्या
ओला दुष्काळ जाहीर करा, विमा व सवलती द्याsakal

अकोला : ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना विमा व इतर सवलती द्या, (Provide insurance and other concessions to farmers)त्यांच्या इतर समस्यांचे निराकरण तातडीने करा, इत्यादी मागण्या शेतकरी बचाओ आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आल्या. या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

अमरावती विभागात ढग फुटी, पूर, बोंडअळी आदी विविध नैसर्गिक आपत्तींमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना महसुली अधिकाऱ्यांनी नियमबाह्यपणे, बनावट ५५ ते ७० पैसेपेक्षा पीक पैसेवारी काढली. कृषी विभागानेही पीक पाहणी आणि कापणीचे प्रयोग नियमबाह्य करून शेतकऱ्यांना शासकीय सवलती व पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले. संबंधित अधिकाऱ्यांनी नियमानुसार असणाऱ्या समित्या सदस्य, सरपंच, सोसायटी अध्यक्ष व शेतकऱ्यांना निमंत्रित केले नाही व त्यांच्या अधिकारांची पायमल्ली केली.

ओला दुष्काळ जाहीर करा, विमा व सवलती द्या
नागपूर : शेकडो वर्षांनंतर विदर्भात रानटी हत्तीचा मुक्काम

आता मात्र, शासनाने तातडीने शेतकऱ्यांची दखल घ्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, विमा द्यावा, केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती घोषित करावी, पंतप्रधान सन्मान निधी सहा हजार वर्षाला भिक नको, सातव्या वेतन आयोगानुसार घामाचे व शेतमालाचे दाम मिळावेत, केंद्र सरकारने किमान हमी भावाचा कायदा करावा.

लखिमपूर, खैरीमध्ये शेतकरी हत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गृहराज्यमंत्री अजय मिश्राला बरखास्त करावे व अटक करावी, इत्यादी मागण्याचा ठराव १९ डिसेंबर रोजी शेतकरी बचाओ आंदोलनच्या संपर्क कार्यालयात शैलेद्र गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली व संयोजक भाई रजनीकांत, अमरावती विभागातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित संपर्क बैठकीत घेण्यात आला.

ओला दुष्काळ जाहीर करा, विमा व सवलती द्या
बेळगाव महापालिकेचे स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज, प्रस्ताव मागविले

या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही तर, तिव्र आंदोलन करण्याचाही निर्णय यावेळी झाला. याकरिता २३ डिसेंबर बारातांडा सत्याग्रह दिन ते २७ डिसेंबर डाॅ. पंजाबराव देशमुख जयंतीपर्यंत शेतकरी जागरण अभियान राबविण्याचे ठरले.

यावेळी कृती समिती अध्यक्ष शैलेंद्र विनायकराव गावंडे, कार्याध्यक्ष केशवराव मानकरी, उपाध्यक्ष देवराव दिवसे (यवतमाळ), सचिव अभिमन्यू धनोकार, सहसचिव विजय यादव, संघटक अरविंद अंधारे, सदस्य देवराव पाटील, कैलास उबाळे, विठ्ठल माळी, निवृत्ती लोडम, दत्ता देशमुख, अमोल मुटकुळे, गणेश बिहाडे, गोपाल मांडेकर व अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com