अ‍ॅग्रो

बांगलादेश भारतातील कापसाचा मोठा खरेदीदार

सकाळवृत्तसेवा

पाकिस्तानकडून अायात कमी; चीनमध्ये १७ टक्के निर्यात

मुंबई - भारतातील कापसाला शेजारील देशांकडून मोठी मागणी अाहे. याअाधी पाकिस्तान हा भारतातील कापसाचा मोठा खरेदीदार होता. अाता त्याची जागा बांगलादेशने घेतली अाहे. भारतातून होणाऱ्या एकूण कापूस निर्यातीपैकी एकट्या बांगलादेशने ४० टक्के कापूस खरेदी केला अाहे, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग अायुक्त तसेच कापूस सल्लागार मंडळाच्या अध्यक्ष कविता गुप्ता यांनी दिली अाहे. कापूस सल्लागार मंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली अाहे.

गेल्या मे महिन्यामर्यंत मिळालेल्या कापूस निर्यात अाकडेवारीनुसार, बांगलादेशमध्ये सर्वाधिक कापूस निर्यात झाला असल्याचे दिसून अाले अाहे. २०१५-१६ मध्ये पाकिस्तानने भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीतील ४० टक्के कापूस खरेदी केला होता. मात्र गेल्या वर्षभरात पाकिस्तानकडून कमी कापूस अायात करण्यात अाला अाहे. गेल्या मे महिन्यापर्यंत पाकिस्तानने भारतातून अायात केलेल्या कापसाचा वाटा केवळ १५.२९ टक्के अाहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

बांगलादेशनंतर चीन भारतातील कापसाचा दुसऱ्या क्रमाकांचा खरेदीदार ठरला अाहे. भारतातून चीनमध्ये १७ टक्के कापूस निर्यात करण्यात अाली अाहे. गेल्या वर्षी चीनमध्ये केवळ ९ टक्के कापूस निर्यात झाली होती. मात्र, २०१६-१७ मध्ये भारतातून होणाऱ्या एकूण कापूस निर्यातीत घट झाली अाहे. या वर्षात ६० लाख गाठी कापूस निर्यात झाली अाहे. याअाधीच्या वर्षी (२०१५-१६) ६९.०७ लाख गाठी कापूस निर्यात झाली होती. भारतात यंदा २.६ दशलक्ष गाठी (एक गाठ १७० किलो) कापूस अायातीचा अंदाज व्यक्त करण्यात अाला अाहे. गेल्या वर्षी २.३ दशलक्ष गाठी कापूस अायात झाली होती. मेपर्यंत देशात १.४ दशलक्ष गाठी कापूस अायात झाली अाहे, अशी माहिती गुप्ता यांनी दिली अाहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT