Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

Delhi Bomb Threats South Korea Connection: याप्रकरणी इंटरपोलची मदत घेण्यात आली होती. त्यावेळी रशियन कनेक्शन समोर आले. त्यावेळी @mail.ru वरून ई-मेल पाठवले जात असल्याचेही समोर आले.
Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

दिल्ली-एनसीआरमधील शाळा, रुग्णालये, राष्ट्रपती भवन आणि आयजीआय विमानतळासह अनेक सरकारी इमारतींमध्ये बॉम्ब ठेवल्याबद्दलच्या ई-मेल्सच्या तपासात अनेक नवीन तथ्ये समोर येत आहेत.

पाठवलेल्या ई-मेलच्या तपासादरम्यान पोलिसांना असे आढळले की, बुधवारी ई-मेलसाठी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) वापरला गेला नाही.

ई-मेल पाठवण्यासाठी आरोपीने फ्रान्समधून Gandi.net हे डोमेन खरेदी केले. यानंतर दक्षिण कोरियामध्ये आयडी तयार करून तेथून ई-मेल पाठवण्यात आले.

दहशतवाद्यांनी या ई-मेल्सनंतर महत्त्वाच्या इमारतींवर बॉम्बस्फोट करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, पोलीस रुग्णालय, राष्ट्रपती भवन किंवा आयजीआय विमानतळासह अन्य इमारतींची तपासणी केली असता काहीही आढळून आले नाही. (South Korea, France Connection To Delhi Bomb Threats)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 666Darktriad666@gmail.com या आयडीवरून ई-मेल पाठवला होता. मात्र, काही प्रकरणांमध्ये अमेरिका आणि नेदरलँडमधूनही असे ई-मेल आले आहेत. तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी असे डावपेच अवलंबण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मंगळवारी पाठवलेल्या सर्व ई-मेलसाठी सॅमसंग उपकरणांचा वापर करण्यात आला आहे. पोलीस ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) एड्रेस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पोलिसांकडून पत्रही पाठवण्यात आले आहे.

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर
Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

अन्य एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवार आणि बुधवारी पाठवलेले ई-मेल तपासले असता, दोन्ही घटना एकाच गटाकडून झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दोन्ही दिवसांची वेळ आणि त्यांचा हेतू लक्षात घेऊन या प्रकरणात एकाच गटाचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत.

चाणक्यपुरी येथील संस्कृती शाळेत बॉम्ब ठेवल्याचे दोन ई-मेल आले होते. दोन्हींसाठी वेगवेगळे आयडी वापरण्यात आले. एक ई-मेल @mail.ru वरून आणि दुसरा @gmail वरून पाठवले आहेत. दोन्ही भाषा जवळपास सारख्याच होत्या, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दोन्ही ई-मेल काही मिनिटांच्या अंतराने आले. हे दोन्ही मेल सायबर युनिटकडे सोपवण्यात आले आहेत. IFSO अधिकारी मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर
लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

12 एप्रिल 2023 रोजी सादिक नगर येथील भारतीय शाळेला बॉम्बची धमकी देणारा संदेश आला होता. त्याचा तपास अद्याप सुरू आहे.

याप्रकरणी इंटरपोलची मदत घेण्यात आली होती. त्यावेळी रशियन कनेक्शन समोर आले. त्यावेळी @mail.ru वरून ई-मेल पाठवले जात असल्याचेही समोर आले. याचा अर्थ बुधवारी 223 ठिकाणे आणि भारतीय शाळांना आलेल्या ई-मेलमध्ये हेच डोमेन वापरले गेले. याचाही तपास पोलीस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com