अ‍ॅग्रो

आयात शुल्क वाढविल्याने सोयाबीन, उडीद, मुगाला भाव - पाशा पटेल

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रासह देशभरातील सोयाबीन, मूग, उडीद उत्पादकांच्या शेतमालाच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारने ५ ऑगस्ट ते १७ नोव्हेंबर दरम्यान घेतलेल्या निर्णयांनंतर ही वाढ झाली असून, या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील सोयाबीनला २७५० ते २९९०, तर उडदाला ३५०१ ते ५६०० इतका दर मिळण्यास सुरवात झाली. सोयाबीनची खासगी कंपन्या ३,१२० रुपयांनी सध्या खरेदी करत असल्याची माहिती राज्याच्या कृषी आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोमवारी (ता. ४) केला. 

मंत्रालयातील वार्ताहर कक्षात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाशा पटेल पुढे म्हणाले, की केंद्र सरकारने आयात शुल्कात  मोठ्या प्रमाणावर वाढ केली असून विविध शेतमालांवरील निर्यात शुल्क कमी करण्यात आलेले आहे.

यूपीए सरकारच्या काळात क्रूड पामतेलावर १५ टक्के आयात शुल्क होते, त्यात दुपटीने वाढ करत आता ३० टक्के करण्यात आले आहे. तर, पूर्वी रिफाइन पामतेलावर असलेल्या २५ टक्के आयात शुल्कात वाढ करत ते ४० टक्के, सूर्यफूल तेलाच्या आयात शुल्कातही १२.५ टक्क्याने वाढीसह क्रूड सोयाबीन तेल, रिफाइन सोयाबीन तेल, क्रूड आणि रिफाइन रेपसीड मोहरी कनोला तेलांवर ही १२.५ ते १५ टक्के आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे याचा देशांतर्गत शेतकऱ्यांना वाढीव दराच्या रूपात लाभ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्यात हरभरा आणि पिवळा वाटाण्याच्या दरातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, या पिकांच्या पेरणी क्षेत्रातही वाढ झाली आहे. 

सध्या मिळत असलेल्या कडधान्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, एकट्या सोयाबीनच्या दरात जानेवारी महिन्यात ३,२०० रुपयांपर्यंत वाढ होणार असल्याचा अंदाजही पाशा पटेल यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

अप्सरा बनली मंजुळा ! सालबर्डी सिनेमात सोनालीचा दिलखेचक अंदाज आणि भन्नाट डान्स

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

SCROLL FOR NEXT