अ‍ॅग्रो

उसाला निर्यातक्षम केळीची जोड

अभिजित डाके

सांगली (जिल्ह्याचे ठिकाण) शहरापासून अवघ्या वीस मिनिटांवर असलेले तुंग (ता. मिरज) गाव ढोबळी मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. याच गावातील तृषांत अण्णा मगदूम हे युवा शेतकरी. त्यांची शेती साडेचार एकर आहे. गावाचे बागायती क्षेत्र सुमारे ६०० हेक्‍टर आहे. ढोबळी व्यतिरिक्त झेंडू, हळद या पिकांसह ऊस मोठ्या प्रमाणात आहे. गावातील शेतीला कृष्णामाईची (नदी) कृपा आहे. मुबलक पाणी असल्याने भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. 

पारंपरिक शेती बदलतेय 
गावात युवक शेतकऱ्यांची संख्या कमी नाही. साहजिकच नव्या विचारांसह नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याला प्राधान्य दिले जाते. तरुणांबरोबर जुने जाणते शेतकरीही शेतीतील बदल स्वीकारू लागले आहेत. केवळ विक्रमी उत्पादन न घेता बाजारपेठेचाही अभ्यास करून पिके घेण्यावर अनेकांचा भर आहे. कोणते पीक कधी घ्यायचे याचा अभ्यास झाल्याने प्रत्येकामध्ये निरोगी स्पर्धाच सुरू झाली आहे. 

नोकरी सोडून गावची शेती 
तृषांत सांगतात की मी बीए आणि आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. मला नोकरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे पुणे गाठले. तिथे २००२ ते २०१० पर्यंत नोकरी केली. दरम्यानच्या काळात वडिलांचे निधन झाले. त्यामुळे पुन्हा गावी परतलो. पहिल्यापासूनच शेतीची आवड असल्याने शेतीचे धडे गिरवणे अवघड गेले नाही. 

भावाने दाखविली वाट 
शेती एकमेकांच्या साह्याने आणि सल्ल्याने केली तरच फायद्याची ठरते, पण केवळ एकच पीक न घेता त्यामध्ये विविधता असणे गरचेचे आहे हे तृषांत यांना बंधू अविनाश यांनी शिकवले. सन २००१ मध्ये पहिल्यांदा झेंडूची लागवड केली. त्यामधून उत्पादन अपेक्षित मिळाले. अन् उसाबरोबर अन्य पिके घेण्याचा मगदूम बंधूनी निर्णय घेतला. 

ताज्या उत्पन्नासाठी आंतरपिके 
मगदूम म्हणतात, की उसाला सुमारे १८ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे पैसे लवकर हातात येत नाहीत. मग उसात आंतरपीक घेतले तर नक्कीच काहीतरी पैसा मिळू शकतो. मग उसात कोथिंबीर, मेथी, फ्लाॅवर यांसारखी पिके घेऊ लागलो; पण ती घेताना बाजारपेठेचा अभ्यास करतो. त्याचा नक्कीच फायदा होतो. दोन पैसे मिळत असल्याने उसातला मोठा खर्च कमी होण्यास मदत होते. 

मार्गदर्शन 
माझे मित्र प्रताप खबाले आणि तुकाराम कापसे, आबासाहेब साळुंखे यांचे मार्गदर्शन केळीसाठी उपयुक्त ठरले. अडचणी येत राहिल्या. पण जिद्द सोडली नाही. 

उत्पादन (एकरी)
पावसाळी हंगाम लागवडीत - ३० ते ३५ टन
उन्हाळी - २५ टन 
सन २०१७ - ३७ टन - दर प्रतिकिलोस १४ रु.  
यंदा - ३५ गुंठे क्षेत्र - आत्तापर्यंतचे उत्पादन १५ टन - प्लॉट अजून सुरू. 
दर प्रतिकिलोस साडेतेरा रु. 

बाजारपेठ 
मगदूम सांगतात की बांधावर येऊन व्यापारी केळी खरेदी करतात. मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणी माल जातो. मागील वर्षापासून व्यापाऱ्यांना निर्यातीसाठी माल देत आहे. अलीकडील वर्षांत सरासरी दर किलोला ८ रुपयांपासून १०, १४ रुपयांपर्यंत मिळाला आहे. 

किफायतशीर अर्थकारण
मगदूम सांगतात की एकरी तीस टन उत्पादन व किलोला १० रुपये दर मिळाला, तरी तीन लाख रुपये मिळतात. एक लाख रुपये उत्पादन खर्च धरला तर दोन लाख रुपये हाती पडतात. 
निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेण्यासाठी एकरी १० हजार रुपये जादा खर्च होतो. निर्यातक्षम केळीला स्थानिक बाजारपेठेपेक्षा दरही अधिक मिळतो. 

मगदूम म्हणतात...
पैसे देणारे आणि ऊर्जा देणारे पीक म्हणून उसाकडे पाहतो. आमच्या परिसरात केळीची लागवडही मोठ्या प्रमाणात केली जाते. उसाला पर्याय नव्हे; पण त्याला जोड म्हणून त्याकडे वळण्याचा निर्णय २०१२-१३ च्या दरम्यान घेतला. केळीची स्थानिक बाजारपेठेत विक्री करायची नव्हती. त्यामुळे पहिल्यापासूनच निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणे हेच उद्दिष्ट होते. त्यादृष्टीने परिपूर्ण अभ्यास व शेतकऱ्यांच्या शेतांच्या भेटी घेतल्या. 

जमिनीची चांगली मशागत केल्यास व तिची निगा राखल्यास उन्हाळी हंगामातही केळीचे चांगले उत्पादन येऊ शकते. 

मगदूम यांच्या केळी शेतीची वैशिष्ट्ये 
जमिनीत कोणता घटक कमी, जास्त आहे हे माती परीक्षणातून पाहून त्यानुसार खतांची मात्रा ठरविली जाते. यामुळे जमिनीचा पोत आणि सुपीकता राहण्यास मदत होते. 

केळीचा हंगाम संपल्यानंतर त्याचे खुंट जमिनीत गाडले जातात. त्यातून  

सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत 

जमिनीचा पोत सुधारला जातो 

केळीच्या रानात उसाची लागवड केल्यास उसाचा उतारा वाढण्यास मदत 
आडसाली उसाचे उत्पादन ः पूर्वी - एकरी ६० टनांपर्यंत आता - ९० टनांपर्यंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT