
थोडक्यात:
भारतात टेस्लाचे पहिले शोरूम उघडताच इलॉन मस्क यांची संपत्ती 2.47 अब्ज डॉलरने वाढून 362 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.
टेस्लाचा शेअर 1.08 % वाढीसह 316.90 डॉलर्सवर बंद झाला आणि कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 11 अब्ज डॉलरची भर पडली.
तज्ज्ञांच्या मते भारतातील बाजारपेठेमुळे टेस्लाला नव्या ग्राहकांचा मोठा बेस मिळेल व दीर्घकालीन विक्रीत झपाट्याने वाढ होऊ शकते.
Tesla Opens Doors in Mumbai: भारतामध्ये जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्लाने (Tesla) अखेर धमाकेदार सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, भारतात टेस्लाची एंट्री होताच कंपनीचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या संपत्तीतही मोठी वाढ झाली आहे. मागील काही महिन्यांत टेस्लाच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने इलॉनमस्कच्या नेटवर्थमध्ये घट झाली होती. मात्र आता भारताच्या बाजारपेठेत टेस्ला उतरल्यामुळे परिस्थिती बदलताना दिसत आहे.