अ‍ॅग्रो

करडईचे लागवड क्षेत्र घटले

सकाळवृत्तसेवा

परभणी - मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा कल हरभऱ्याकडे वाढल्यामुळे यंदा करडईच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. या तीन जिल्ह्यांत करडईचे सर्वसाधाण क्षेत्र ५२, ६०० हेक्टर असताना शनिवार (ता. १८) पर्यंत केवळ २,८४० हेक्टरवर पेरणी झाली होती.

दरम्यान, शनिवार(ता. १८)पर्यंत या तीन जिल्ह्यांत ३ लाख ७ हजार ३२ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. गहू, हरभरा पेरणी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची मूठ अजून चाड्यावरच आहे.

नांदेड जिल्ह्यात रब्बीचे सर्वधारण क्षेत्र १ लाख ३३ हजार ४१५ हेक्टर आहे. शनिवारपर्यंत ज्वारीची १३ हजार ६१७ हेक्टरवर, गहू २,८०५ हेक्टरवर, हरभरा ७२ हजार १९८ हेक्टर आदींसह एकूण ९० हजार ६९७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. 

परभणी जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर आहे. शनिवारपर्यंत ज्वारीची ७५ हजार ४८ हेक्टर, गहू ६,७१४ हेक्टर, हरभरा ५२ हजार १८४ हेक्टर आदींसह एकूण १ लाख ३६ हजार ३१८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यांत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख २६ हजार २९० हेक्टर आहे. शनिवारपर्यंत ज्वारीची १० हजार ५३९ हेक्टर, गव्हाची १२ हजार ७४१ हेक्टर, हरभऱ्याची ५४ हजार ६१३ हेक्टर आदी पिकांसह एकूण ८० हजार १७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

दरम्यान, थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी कृषिपंपांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. तसेच अनेक भागात योग्य दाबाने वीजपुरवठा होत नसल्यामुळे गहू, हरभरा या पिकांच्या पेरणीसाठी शेत ओलविण्यासाठी अडथळे येत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरणी रखडत चालली आहे. तीन जिल्ह्यंतील एकूण २ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्र अद्याप नापेर आहे.

करडईचे सर्वसाधारण क्षेत्र ५२ हजार हेक्टर 
रब्बी हंगामातील प्रमुख गळीत धान्य पीक असलेल्या करडईचे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र ५२ हजार ६०० हेक्टर आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र ५ हजार ८२ हेक्टर असताना १ हजार ११४ हेक्टरवर, परभणी जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र २५ हजार २०९ हेक्टर असताना १ हजार ५८२ हेक्टरवर, हिंगोली जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र २२ हजार ३०९ हेक्टर असताना ११४ हेक्टरवर करडईची पेरणी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी तीन आरोपींना पोलीस कोठडी तर एकाला न्यायालयीन कोठडी

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT