Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Share Market Today: खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे आठवड्याच्या पहिल्या व्यापार सत्रात भारतीय शेअर बाजार जोरदार वाढीसह बंद झाला. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 938 अंकांच्या उसळीसह 74,668 अंकांवर बंद झाला
Share Market Latest Update
Share Market Latest UpdateSakal

Share Market Closing Latest Update 29 April 2024: आज सोमवारी (29 एप्रिल) चौथ्या तिमाहीच्या निकालांमुळे शेअर बाजारात वाढ दिसून आली. आज बँकिंग शेअर्सचे बाजारावर वर्चस्व होते. यामुळे बँक निफ्टीने नवीन उच्चांक गाठला आणि निर्देशांक 49,400च्या वर पोहोचला होता.

आठवड्याची सुरुवात जोरदार झाली आणि बाजार दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाला. निफ्टी बँकेने 49,473 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला, निफ्टी 223 अंकांनी वाढून 22,643 वर बंद झाला. सेन्सेक्स 941 अंकांनी वाढून 74,671 वर बंद झाला.

Share Market Closing
Share Market ClosingSakal
Share Market Latest Update
Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती 

आजच्या व्यवहारात फार्मा, एफएमसीजी, मेटल, ऊर्जा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स आजच्या व्यवहारात तेजीसह बंद झाले. मात्र ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 26 शेअर्स तेजीसह तर 4 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing
Share Market ClosingSakal

कोणते शेअर्स घसरले?

आजच्या व्यवहारात, आयसीआयसीआय बँकेचा शेअर्स 4.67 टक्क्यांच्या वाढीसह उच्चांकावर बंद झाला. तर एसबीआय 3.09 टक्के, इंडसइंड बँक 2.93 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 2.93 टक्के, ॲक्सिस बँक 2.47 टक्के, एनटीपीसी 2.07 टक्के वाढीसह बंद झाले. घसरलेल्या शेअर्समध्ये एचसीएल टेक 5.79 टक्के, आयटीसी 0.44 टक्के, विप्रो 0.37 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.01 टक्क्यांनी घसरणीसह बंद झाले.

Share Market Latest Update
Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?
S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

बीएसई मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर

शेअर बाजारातील नेत्रदीपक वाढीमुळे भारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपने पुन्हा एकदा नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 406.59 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 404.09 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.50 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com