Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

Nashik News : मे व जून महिन्यात येथे भाजीपाल्याची आवक घटण्याचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत.
A businessman selling vegetables at the Mahatma Phule vegetable market in Malegaon.
A businessman selling vegetables at the Mahatma Phule vegetable market in Malegaon. esakal

मालेगाव : येथील भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक स्थिर आहे. दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्यावर कसमादे परिसरात असंख्य शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली. कमी पाण्यात येणारे कोथिंबिर, गिलके, दोडके, पालक, फ्लॉवर, कोबी, काकडी, मेथी या पिकांची लागवड करण्यात आली आहे. सध्या कडक ऊन पडत असले तरी भाजीपाल्याची आवक कमी झाली नाही. मे व जून महिन्यात येथे भाजीपाल्याची आवक घटण्याचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत. (Nashik Malegaon vegetable arrival stable news )

कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. यावर्षी दुष्काळाचे सावट असल्याने विहिरींना पाणी कमी असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा, मका, बाजरी कमी प्रमाणात लावली. ही पीके तीन ते चार महिन्याची असतात. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांनी एक ते दीड महिन्यात येणारी भाजीपाला पिकांची लागवड केली आहे.

येथील भाजीपाला बाजारात पालेभाज्यांची आवक स्थिर आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा आवकमध्ये घट झाली नाही. यामुळे भाजीपाल्याचे दरही स्थिर आहे. येथील बाजारात गिरणा डॅम, वडगाव, दाभाडी, पिंपळगाव, रावळगाव, डाबली, चंदनपुरी, पाटणे, टेहरे, महालपाटणे, ब्राह्मणगाव यासह चांदवड व चाळीसगाव तालुक्यातून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येत आहे.

गेल्या वर्षी शंभर ते दिडशे रुपये किलोने मिळणारी कोथंबिर सध्या ४० रुपये किलोने विकली जात आहे. भाजीपाला बाजारात लिंबूला सर्वात जास्त मागणी असून, १६० रुपये किलोने लिंबू विक्री होत आहे. गेल्या पंधरा दिवसाच्या तुलनेने लिंबुच्या भावात घसरण झाली आहे.

कसमादेसह जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील कोथंबिर विक्रीस येत आहे. येथे टोमॅटो १०० ते १५० रुपये कॅरेटने विकला जात आहे. गेल्या वर्षी टोमॅटोची लाली वाढली होती. यंदा पाणी कमी असूनही टोमॅटोला पाहिजे तसा भाव मिळत नाही.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही यातून निघेनासा झाला आहे. तोतापुरी कैरीची पूर्व भागात फोडणी करुन दोन ते पाच रुपयाला विकली जात आहे. पूर्व भागातील गल्ली-मोहल्यांमध्ये असलेल्या छोट्या दुकानांमध्ये दुकानदार कैरीच्या फोडी करुन त्यात मीठ, मिरची लावून विक्री करतात. त्यामुळे कैरीलाही मागणी आहे. (Latest Marathi News)

A businessman selling vegetables at the Mahatma Phule vegetable market in Malegaon.
Loksabha Diary : धैर्यशील मानेंच्या गावात मतविभाजन, निवडणुकीत फटका बसणार?

"लग्नसराई असल्याने भाजीपाल्यात बटाटा, घेवडा, तोंडली, गाजर, वांगी, लिंबू, कोथिंबिरीला मागणी आहे. ऊन असल्यामुळे बाजारात सायंकाळी गर्दी होते. सायंकाळी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विकला जातो. तोतापुरी कैरीला येथे मागणी आहे."

- बाळा वाघ, भाजीपाला विक्रेता, मालेगाव

भाजी प्रकार - दर (प्रतीकिलो)

गिलके, दोडके - ६० रुपये

काकडी - २५ रुपये

कांदा पात - २० जुडी

भोपळा - १५ रुपये

कोबी - २५ रुपये

फ्लॉवर - ४० रुपये

वाल - ६० रुपये

गवार - ८० रुपये

पालक - १५ रुपये

मेथी - १५ ते २० रुपये जुडी

भेंडी - ६० रुपये

A businessman selling vegetables at the Mahatma Phule vegetable market in Malegaon.
Nashik Summer Heat : कडक उन्हामुळे तापाच्या रुग्णांत वाढ! पारा 42 अंशाच्या पुढे गेल्याने जीवाची काहिली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com