young man from a suicidal family stubbornly cultivates agriculture
young man from a suicidal family stubbornly cultivates agriculture 
अ‍ॅग्रो

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील युवकाने जिद्दीने सावरली शेती

डॉ. रवींद्र भताने

‘मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा’ ही ज्येष्ठ कवी कै. कुसुमाग्रज यांच्या कवितेची ओळ लातूर जिल्ह्यातील चापोली (शंकरवाडी) येथील शिवचरण कोडबळे या तरुणाला पुरेपूर लागू होते. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून वडिलांची आत्महत्या, कोसळलेले आभाळ, निराशेच्या बेड्या आदी संकटांवर जिद्दीने मात करीत त्याने शेतीची सूत्रे हाती घेतली. उत्तम नियोजनातून शेती घडवली. दुग्धव्यवसायाची साथ दिली. घराचा मोठा आधार बनून कौटुंबिक अर्थकारण सक्षम केले. 

लातूर जिल्ह्यातील चापोली (ता. चाकूर) येथील शिवचरण कोडबळे यांची वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. डोक्यावरील कर्जाचा डोंगर व सततच्या नापिकीला कंटाळून त्यांचे वडील कशिनाथ कोडबळे यांनी जानेवारी २०१५ मध्ये आत्महत्या केली. घरातील कर्ता पुरुष गेल्याने घरावर संकट कोसळले. शासनदरबारी शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झाली. तत्कालीन मंत्री राजकुमार बडोले यांनी भेट देत एक लाख रुपयांची मदत दिली. पण, अशावेळी खचून जाऊन चालणार नव्हते. चोवीस वर्षीय शिवचरण यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. हिम्मत एकवटून आई, लहान भाऊ व बहीण यांना आधार देत शेतीची सूत्रे हाती घेतली.  

शेतीचे नियोजन 
आपली शेती व्यावसायिक करून फायद्यात आणणे हे मुख्य उद्दिष्ट शिवचरण यांच्यापुढे होते. त्यानुसार त्यांनी पिकांचे पद्धतशीर नियोजन केले. आठ एकरांपैकी सुमारे दोन ते अडीच एकर क्षेत्रात हंगामानुसार वर्षभर भाजीपाला पिके घेण्यास सुरवात केली. उर्वरित क्षेत्रात हंगामी पिके घेण्यास सुरवात केली. संरक्षित सिंचनाचा पर्याय म्हणून विहीर व कूपनलिका आहे.   

आठवडी बाजारात थेट विक्री 
शिवचरण यांचे वैशिष्ट्य म्हणजे व्यापाऱ्यांना विक्री न करता थेट ग्राहक विक्रीवर त्यांचा भर असतो, त्यासाठी सोमवारी अहमदपूर, बुधवारी चापोली, शुक्रवार चाकूर व रविवार हाळी या चार आठवडी बाजारांत स्वतः भाजीपाला घेऊन जाऊन विक्री करतात. त्यातून हमाली, भाडेखर्च व मध्यस्थ यांच्यापासून सुटका मिळते. थेट विक्रीमुळे चार पैसे जास्त मिळतात. प्रत्येक आठवडी बाजारात साधारण दोन ते अडीच हजार रुपये मिळतात. महिन्याकाठी भाजीपाला विक्रीतून साधारण २५ ते तीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता १५ हजार रुपये हाती येतात. 

कोडबळे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 
  केवळ एकाच पिकावर भर देण्यापेक्षा बहुविध पिकांचा समावेश   बाजारपेठेतील मागणीनुसार पुरवठा या सूत्रानुसार भाजीपाला लागवड   जास्तीत जास्त शेणखताचा उपयोग   शेतातच वास्तव्य असल्याने शेतीत २४ तास लक्ष   सिंचनासाठी एक विहीर व एका कूपनलिकेचा पर्याय   ठिबकसह तुषार सिंचनाचा वापर   शेतीकामांमध्ये वेळेला

अधिक महत्त्व राबते सारे कुटुंब 
शिवचरण यांची आई शिवनंदा, पत्नी सुवर्णा, लहान भाऊ माधव, त्याची पत्नी अश्विनी, बहीण गंगासागर असे सारे कुटुंब दिवसभर शेतीत राबते. प्रत्येकाने आपापल्या कामाची जबाबदारी वाटून घेतली आहे. त्यातून एकोपा टिकून राहतो. कामे वेळेत होतात. मजुरीवरील होणाऱ्या होणाऱ्या खर्चात बचत होते.  

पारंपरिक पिकांतही सातत्य 
भाजीपाला पीकपद्धती सांभाळताना सोयाबीन तीन एकर, तर दोन एकरांत ऊस लागवडीत सातत्य ठेवले आहे. सोयाबीनचा एखाद्‍दुसरा अपवाद वगळता एकरी सरासरी सहा क्विंटल, तर उसाचे एकरी ४० टनांपर्यंत उत्पादन मिळते. 

दुग्ध व्यवसायाची जोड 
शेतीव्यतिरिक्त उत्पन्न वाढवण्यासाठी तीन म्हशींचे संगोपन केले आहे. बळिराजा सबलीकरणअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून म्हशींची मदत झाली आहे. मुक्त गोठा पद्धतीने जनावरांचे संगोपन होते. वर्षभर हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून अर्ध्या एकरात नेपियर वाणाच्या गवताची लागवड केली आहे.दोन्ही वेळचे मिळून १५ लिटर दूध संकलित होते. पाच लिटर दुधापासून दही तयार करून हॉटेलला, तर उर्वरित दुधाची ५० रुपये प्रतिलिटर दराने विक्री होते. दिवसाला तीन म्हशींसाठी साधारण २०० रुपये खर्च येतो.

जमा-खर्चाची नोंद 
कोडबळे कुटुंबाला शेतीच्या नोंदी करून ठेवण्याची सवय आहे. लागवडीपासून ते कोणत्या बाजारात किती विक्री झाली, ताळेबंद, कोणत्या वेळेस किती दर मिळाला, अशा नोंदी सातत्याने ठेवल्याने पुढील हंगामात कोणती पिके घ्यायची याचे नियोजन करणे सुलभ होते. 

शेती व्यवस्थापनातील ठळक बाबी
  भाजीपाला पिकांतून ताजा पैसा मिळतो, त्यामुळे घरच्या दैनंदिन गरजा भागविण्यास ही पीकपद्धती उपयुक्त ठरते. 
  हंगामनिहाय नियोजन 
  मे ते ऑगस्ट – एक एकर टोमॅटो, दहा गुंठे गवार, दहा गुंठे भेंडी, दहा गुंठे चवळी, दहा गुंठे वरणा, दहा गुंठे शेपू, दहा गुंठे कोथिंबीर, वीस गुंठे कोबी 
  सप्टेंबर ते जानेवारी – टोमॅटो, दहा गुंठे गवार, दहा गुंठे भेंडी
  फेब्रुवारी – कोबी 
  मार्च – २० गुंठे मिरची, दहा गुंठे मेथी
  एप्रिल – दहा गुंठे मेथी
  वर्षभर दहा ते १२ प्रकारच्या भाज्यांची लागवड 
  आठवड्यातून चार बाजारांसाठी काही ना काही भाजी विक्रीसाठी येईल अशा प्रकारे कौशल्यपूर्ण नियोजन करण्याकडे कल  
  ताजा व प्रतवारी केलेला भाजीपाला, त्यामुळे बाजारात मागणी चांगली.
  वेळेवर खुरपणी करून तणमुक्त भाजीपाला ठेवला जातो.
  अन्य पिके - नेपियर गवत - अर्धा एकर, ऊस - दोन एकर, सोयाबीन - तीन एकर.


‘ॲग्रोवन’मुळे  मिळते प्रेरणा
सकाळी गावात दूध विक्रीसाठी आल्यावर शिवचरण ‘ॲग्रोवन’ घरी घेऊन जातात. त्यातील भाजीपाला, दुग्धव्यवसाय व अन्य पिकांच्या यशोगाथा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन वाचून शेतात प्रयोग करण्याची ऊर्जा तयार होते. शेतीची जबाबदारी हाती घेतली तेव्हा पुरेसा अनुभव नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. मात्र, ‘ॲग्रोवन’ एखाद्या गुरूप्रमाणे मार्गदर्शन देत आहे. आज भाजीपाला व दूध विक्रीतून समाधानकारक उत्पन्न मिळत आहे, असे शिवचरण यांनी सांगितले. राज्यस्तरीय योजनेमध्ये जसे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्राधान्य दिले जाते, त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला प्राधान्य द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.

 शिवचरण कोडबळे, ९५५२८६९०८१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT