अ‍ॅग्रो

आॅगस्टच्या पावसाने पिकांना तारले? 

अमोल कुटे

पुणे - तीन आठवड्यांच्या दीर्घ खंडांनतर दमदार बरसलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढली. या पावसाने अडचणीत आलेल्या खरीप पिकांना तारले, तर काही ठिकाणी अतिवृष्टीने हाताशी आलेली पिके डोळ्यांदेखत वाया गेली. या पावसाने राज्यातील अवघ्या ९५ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी ओलांडली. तर, २५८ तालुक्यांमध्ये सरासरी गाठता आली नाही. ४४ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.  

ऑगस्टमध्ये राज्यातील सर्वच विभागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. सांगलीतील आटपाडी तालुक्यात पावसाने सर्वाधिक ओढ दिली, तर नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात पावसाची मुक्त उघळण झाली. आटपाडीत महिन्याच्या सरासरीच्या ५.७ टक्के, तर अकोले तालुक्यात ३०४ टक्के पावसाची नोंद झाली. तर, पुण्यातील बारामती, सोलापुरातील करमाळा तालुक्यातही पावसाने दडी मारली. तर, पुण्यातील मावळ, साताऱ्यातील महाबळेश्‍वर आणि कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यात दमदार पाऊस पडला. 

पावसाच्या मोठ्या दडीमुळे राज्यात खरीप संकटात आला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, पश्‍चिम विदर्भ, खानदेशात मोठे संकट उभे राहिले. काही ठिकाणी तर उन्हाळा मोडलाच नाही, अशी स्थिती होती. ऊन-पावसाच्या खेळाने पिकांवर कीडींचा प्रादुर्भावही वाढला. हाता-तोंडशी आलेले पीक हातचे जाण्याच्या भीतीने शेतकरी हाताश झाला. यातच पावसाला सुरवात झाली अन् काहीसा दिलासा मिळाला. मात्र, पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याने मूग, उडीद, सोयाबीनसह खारीप पिकांच्या उत्पादनातही घट होणार अाहे. पावसाच्या खंडामुळे होरपळणारी पिके सावरत असतानाच अनेक भागांत अतिवष्टीने नुकसान आणखी वाढले. 

२५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेले तालुके
बारामती २२.३ (पुणे), करमाळा २२.६ (सोलापूर), आटपाडी ५.७ (सांगली).

२०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेले तालुके
अकोले ३०३.८ (नगर), मावळ २०७.८ (पुणे), महाबळेश्‍वर २८२.६ (सातारा), शाहूवाडी २०३ (कोल्हापूर)

राज्यात विभागनिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) स्त्रोत - कृषी विभाग : 
विभाग---सरासरी--पडलेला---टक्केवारी
कोकण---७५७.१---५६७.४---७५
नाशिक---१८९.०---१४५.५---७७
पुणे---२१६.७---१८७.०---८६
औरंगाबाद---१९७.३---१८४.९---९४
अमरावती---२१०.०---१८६.२---८९
नागपूर---३५२.४---२६८.३---७६
--------------------------------
महाराष्ट्र---३०३.३---२३१.२---७६.२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT