Cotton
Cotton 
अ‍ॅग्रो

चीन-अमेरिकेतील तोडग्याने ‘कापूस’ स्थिरावला

चंद्रकांत जाधव

जळगाव - जगातील कापसाचा सर्वात मोठा निर्यातदार अमेरिका व सर्वात मोठा आयातदार चीन यांच्यातील मागील आठवड्यात व्यापारासंबंधी झालेल्या सकारात्मक वार्तालापामुळे कापूस बाजार स्थिर आहे. पुढे सुतासह रुईच्या दरात तेजी येईल, अशी अपेक्षा बाळगून अनेक सौदे सूतगिरणीचालकांनी टाळले आहेत. खंडीचे दर ४३००० ते ४४००० रुपये, असे स्थिर असून, कापसाचे दरही सर्वत्र स्थिरावल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. 

मागील नऊ महिन्यांपासून चीन व अमेरिकेत सुरू असलेले व्यापार युद्ध शमण्याचे संकेत अलीकडेच चीन व अमेरिकेतील चर्चेतून मिळाले आहेत. या दोन्ही देशांमधील अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत व्यापार युद्धामुळे अमेरिकेला आलेली वित्तीय तूट व चीनचे आयात - निर्यात धोरण यावर अधिक चर्चा झाली. त्यात अमेरिकेने आपल्याला या व्यापार युद्धाच्या कालावधीत सुमारे ३५४ अरब डॉलरची तूट आली आहे. चीन जेवढी निर्यात अमेरिकेला करतो, तेवढी आयात चीन अमेरिकेकडून करीत नाही. यामुळे अमेरिकेला वित्तीय तूट आली आहे, असा मुद्दा मांडला. त्यावर चीनने ही तूट अमेरिकेला कशी भरून काढता येईल, यासंदर्भात सविस्तर मुद्दे सांगून येत्या ३१ मार्च २०१९ पर्यंत चीन यासंदर्भात आपली कार्यवाही पूर्ण करील.

अमेरिकेची तूट भरून निघण्यासाठी अमेरिकेकडून चीन सोयाबीनची आयात वाढविल, असा मुद्दा चीनने मांडला. तर अमेरिकेने परकी चलन अधिक लागणार नाही यासाठी मालाच्या बदल्यात मालाची देवाणघेवाण करण्यावर भर दिला. 

अमेरिकेच्या कृषी व संबंधित उत्पादनांवरील आयात शुल्क चीन लवकरच शिथिल करील, असा सकारात्मक पवित्राही घेतला. तीन दिवस ही वार्ता झाली. आता कुठल्या शेतमालावर चीनने आयात शुल्क शिथिल केले व अमेरिकेने चीनकडून आयातीसाठी काय धोरण जाहीर केले. यासंदर्भातील बाबींची सविस्तर माहिती लवकरच समोर येणार आहे. पुढील १५ ते २५ दिवसांत या दोन्ही देशांमधील आयात-निर्यातीला चालना मिळेल, अशी माहिती कापूस व्यापाराचे जाणकार तथा शहादा (जि. नंदुरबार) येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचे कार्यकारी संचालक राजाराम पाटील यांनी दिली. 

कापूस बाजारात तेजी येईल, असे संकेत चीन-अमेरिकेतील वार्तालाप यशस्वी स्थितीत आल्याने वाटत आहे. सध्या व्हीएतनाम, बांगलादेश व चीनकडून सूत खरेदीसंबंधी तेथील आयातदार किंवा खरेदीदारांनी चौकशी केली आहे. त्यांनी सरासरी १८५ रुपये प्रतिकिलो, असे दर देण्याची तयारी केली आहे. परंतु या दरात सौदे निश्‍चित होत नसल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

खंडीच्या दरात किरकोळ वाढ
खंडीचे दर (३५६ किलो रूई) किरकोळ स्वरूपात वाढले आहेत. ते सध्या ४३५०० रुपयांपर्यंत असून, सुमारे २० लाख गाठींची निर्यात पाकिस्तान, बांगलादेश, व्हीएतनाम व चीनमध्ये झाली आहे. भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीला अलीकडे गती दिली आहे. कापूस दर स्थिर आहेत. घसरण थांबली आहे. पण कापूस परदेशात निर्यातीसंबधी अजून हवी तशी मागणी नसल्याची माहिती कापूस निर्यातदार दिनेश हेगडे (मुंबई) यांनी ॲग्रोवनशी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT