Cotton
Cotton 
अ‍ॅग्रो

कापूस उद्योगाचे चीनमध्ये पाच हजार कोटी अडकले

चंद्रकांत जाधव

जळगाव - देशातील सूत व कापूस गाठींचा मोठा खरेदीदार असलेल्या चीनमध्ये कोरोना विषाणूचा धोका कायम असल्याने तेथील कापूस उद्योग ठप्प आहे. परिणामी देशातून पाठविलेले सूत व कापूस गाठी तेथील बंदरांवर पडून आहे. सूत, गाठींचे सौदे पूर्ण न झाल्याने देशातील सूत, गाठींच्या निर्यातदारांचे सुमारे पाच हजार कोटी रुपये अडकल्याची माहिती आहे.

देशात यंदा पाच हजार कोटी किलो सूत उत्पादनाचा अंदाज आहे. यातील २३ ते २५ टक्के सुताची निर्यात अपेक्षित आहे. तर सुमारे ६५ लाख गाठींची निर्यात होऊ शकते. देशातून निर्यात होणाऱ्या एकूण सुतापैकी ४० टक्के सुताचा खरेदीदार चीन आहे. परंतु चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे उद्योग ठप्प झाले आहेत. त्यात तेथील प्रमुख भागातील कापड उद्योग बंद अवस्थेत आहेत. तेथे देशातून पाठविलेले सूत व कापूस गाठी बंदरांवर पडून आहे.

चीनच्या शांघाय, टाईटाई, नानटूंग बंदरांवर सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे सूत पडून आहे. चीनची मालवाहू जहाज (कंटेनर) यंत्रणा बंद असून, तेथून कंटेनर येत नसल्याने देशातील कलकत्ता, जेनएनपीटी, टुटीपोरम, मुंद्रा येथील बंदरांवरही कापूस गाठी व सूत पडून आहे. देशातील बंदरांवर सुमारे १२०० ते १३०० कोटींचे सूत पडून आहे. तर सुमारे तीन लाख कापूस गाठींची उचल झालेली नाही. सौदे झाल्याने देशातील निर्यातदार, व्यापाऱ्यांना चीनकडील खरेदीदारांकडून लेटर ऑफ क्रेडिट (एलसी) प्राप्त झाल्या आहेत. परंतु मालाची उचल होऊन व्यवहार पूर्ण न झाल्याने पैसे अडकले आहेत. सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा हा व्यवहार अडकल्याची माहिती जाणकारांनी दिली. 

देशातील सुताची निर्यात सध्या बांगलादेश, व्हिएतनाम, श्रीलंका, आफ्रिकन देश, युरोपात होत आहे. परंतु चीनच्या तुलनेत तेथून अल्प मागणी आहे. तर कापूस गाठींची निर्यात बांगलादेशात बऱ्यापैकी होत आहे. चीनमधील निर्यात ठप्प असल्याने देशातील कापूस गाठी व सूत निर्यातदार सावध भूमिकेत आहेत. बाजारातील उलाढालीवर परिणाम झालेला आहे. परंतु देशात भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदी वेगात सुरू असल्याने कापूस दरांवर कमी दबाव आहे. कापसाची ४८०० ते ५१०० रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी सुरू आहे. तर खंडीचे दर (३५६ किलो रुई) ३९००० रुपयांपर्यंत स्थिर आहेत. ‘सीसीआय’ने मागील आठवड्यापर्यंत सुमारे ६८ लाख कापूस गाठींच्या कापसाची खरेदी देशात विविध खरेदी केंद्रांच्या माध्यमातून केली आहे. शासकीय खरेदी सुरू असल्याने कापसाचे दर स्थिर असून, देशातील कापूस बाजार सीसीआयच्या भरवशावर असल्याची माहिती मिळाली. 

सुताची उचल मागील १० ते १२ दिवसांपासून कमी झाल्याने आमच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे. कोरोना विषाणूमुळे बंदरे, कापड उद्योगातील कामकाज चीनमध्ये ठप्प आह. व्यवहार सुरळीत न झाल्याने चीनमध्ये अनेक सूत निर्यातदारांचे पैसे अडकले आहेत. त्यामुळे सूतगिरण्यांनाही अडचण सहन करावी लागत आहे. आमच्या गिरणीत तीन कोटींचे निर्यातक्षम दर्जाचे सूत साठवावे लागले आहे. जानेवारीत निर्यात व्यवस्थित सुरू होती, यामुळे कुठलाही सूत साठा नव्हता. 
- दीपक पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, उंटावद होळ (जि. नंदुरबार)

चीनशी सौदा झालेल्या सुमारे चार ते पाच लाख कापूस गाठी बंदरांवर पडून आहेत. निर्यातदारांकडे जिनिंग कारखानदारांचे पैसे अडकले आहेत. देशातील कापूस बाजारात फारसा दबाव दिसत नसला तरी कापूस निर्यात अशीच रखडत सुरू राहिली व सीसीआयची खरेदी थांबली तर बाजारात पुढे दबाव वाढण्याची भीती आहे. 
- अनिल सोमाणी, जिनिंग प्रेसिंग कारखानदार, जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT